शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

तुर्भे डंपिंग ग्राऊंडचा पाचवा सेल बंद होणार

By admin | Updated: November 19, 2016 02:57 IST

तुर्भे डंपिंग ग्राऊंडचा पाचवा सेल तत्काळ बंद करावा या मागणीसाठी रहिवाशांनी भव्य मोर्चा काढण्याची तयारी केली

नवी मुंबई : तुर्भे डंपिंग ग्राऊंडचा पाचवा सेल तत्काळ बंद करावा या मागणीसाठी रहिवाशांनी भव्य मोर्चा काढण्याची तयारी केली होती; पण महापौर सुधाकर सानावणे यांनी रहिवाशांची भेट घेऊन डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा रद्द करण्यात आला. महापौरांसह माजी सभापती सुरेश कुलकर्णी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन पर्यायी जागेचा प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी केली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी तुर्भे डंपिंग ग्राऊंडचा पाचवा सेल तत्काळ बंद करण्याची मागणी केली. डंपिंग बंद होईपर्यंत कामकाज चालू न देण्याचा निर्णय घेतल्याने सभा तहकूब करावी लागली होती. यानंतर शुक्रवारी तुर्भे स्टोअर्समधील हजारो नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली होती. यामुळे महापौर सुधाकर सोनावणे, सभागृह नेते जयवंत सुतार, राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार यांनी नागरिकांची भेट घेतली. महापालिकेने डंपिंग ग्राऊंडवरील पाचवा सेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायी जागेसाठीची फाईल शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. याविषयी तत्काळ निर्णय घेतला जावा यासाठी कोकणभवनमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यांना नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या भावनांची माहिती देण्यात आली. मंत्र्यांनीही याविषयी तत्काळ निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे महापौरांनी नागरिकांना सांगितले. तुमची मागणी मान्य झाली असल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात यावे असे आवाहन केले. या आवाहनानंतर नागरिकांनी आंदोलन स्थगित करून दिलेल्या आश्वासनांची लवकरात लवकर पूर्तता करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. डंपिंग ग्राऊंडच्या पाचव्या सेलची क्षमता संपली असल्यामुळे व कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी डंपिंग हटाव मोहीम सुरू केली होती. या मोहिमेला शिवसेनेसह इतर पक्ष व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. महापालिका मुख्यालयावर मोर्चा घेऊन व सर्वसाधारण सभेतही आवाज उठविला होता. नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे अखेर महापालिकेने पाचवा सेल तत्काळ बंद करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)>सुटकेचा श्वास सोडला तुर्भे डंपिंग ग्राऊंडचा पाचवा सेल बंद करण्यात येणार असून लवकरच पर्यायी जागा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापौरांनी देताच नागरिकांनी टाळ्या वाजवून निर्णयाचे स्वागत केले. दुर्गंधी व प्रदूषणापासून सुटका होणार असल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. >डंपिंग ग्राऊंडसाठी पर्यायी जागा मिळावी यासाठीची फाईल शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. पर्यायी जागा लवकर मिळावी यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. - सुधाकर सोनावणे, महापौर, नवी मुंबई >तुर्भे डंपिंग ग्राऊंडच्या पाचव्या सेलमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. क्षमता संपलेला सेल बंद करण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. महापौरांनी सेल बंद करण्याचे व महसूलमंत्र्यांनी पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. - सुरेश कुलकर्णी