शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

सर्वसाधारण जागेवर सौभाग्यवतीसाठी फिल्डिंग

By admin | Updated: July 21, 2016 02:14 IST

लोणावळ्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या वलवण गावात सर्वसाधारणचे आरक्षण न पडता ही जागा अनुसूचित जातीकरिता आरक्षित

लोणावळा : लोणावळ्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या वलवण गावात सर्वसाधारणचे आरक्षण न पडता ही जागा अनुसूचित जातीकरिता आरक्षित झाल्याने अनेक मातबर इच्छुकांच्या आशा-अपेक्षा धुळीला मिळाल्या आहेत. मात्र, नशिबाने साथ दिली नसली, तरी दुसरी जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने मातबरांनी सौभाग्यवतींसाठी या जागेवर हक्क सांगायला सुरुवात केल्याने पक्षश्रेष्ठींसाठी ही चढाओढ डोकेदुखी ठरणार आहे. लोणावळ्याच्या राजकारणात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नसल्याने शहरात पक्षीय राजकारणापेक्षा वैयक्तिक करिष्मा व त्याला लक्ष्मीच्या कृपाशीर्वादाची जोड देऊनच निवडणुका लढविल्या जातात. मागील काही वर्षांचा इतिहास पाहता वलवण गावातील नगरसेवकांना सर्वाधिक वेळा अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. मागील वर्षीच्या वलवण व नांगरगाव या प्रभागातील सर्वच नगरसेवक हे वलवण गावातील होते. त्यामध्ये सुनील इंगुळकर, अनिल पानसरे, शकुंतला इंगुळकर व रुपाली जाधव यांचा समावेश आहे. वलवणगावाचा विचार केला, तर पाच वर्षांत या प्रभागातील कालेकर मळा, डेनकर कॉलनी व राव कॉलनी वगळता गाव भागात एकही सांगता येईल असे काम न झाल्याने विद्यमान मंडळींना हा विकास विचार करायला लावणारा आहे. या प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी होती. मात्र, जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने येथून माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, रुपाली जाधव, शकुंतला इंगुळकर, माधुरी पाळेकर, कल्पना पानसरे यासह पाळेकर, इंगुळकर, जाधव, होगले, नांदवटे, जांभळे, तारे आदी बड्या घरांमधील इच्छुकांनी सौभाग्यवतीसाठी दावा केला आहे. तर दुसऱ्या जागेसाठीच्या इच्छुकांत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, अमोल गायकवाड, अभिजित देसाई आदींचा समावेश आहे.> प्रभाग रचना : उत्तरेकडून सिल्व्हर व्हॅली ते वलवण धरणापर्यंतच डक्टलाइन, पूर्वेकडे वरसोली गावाची हद्द आहे. दक्षिणेकडे रेल्वे गेस्ट हाऊस ते बापदेव मंदिरापर्यंतचा रस्ता ते राव कॉलनी ते डेनकर कॉलनीची हद्द. कालेकर मळा ते मास बिल्डरपर्यंतचा रस्ता ते रॉन्व रिअ‍ॅलिटी हद्द, सर्वे नं. १३४ ते स्पोर्ट कॉम्प्लेक्स आरक्षणपर्यंतचा रस्ता, स. नं. ११५ ते खत्री पार्क सोसायटीलगतची इंद्रायणी नदी ते वरसोली गावाची हद्द व पश्चिमेला सिल्व्हर व्हॅली ते दस्तगीर गॅरेज, रेल्वे गेस्ट हाऊसपर्यंतचा रस्ता.