शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

एक ताप,धोका चार आजारांचा

By admin | Updated: June 23, 2016 03:56 IST

कडकडीत उन्हामुळे मुंबईकरांची लाही लाही होत होती. पण पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुंबईकर सुखावले आहेत. पावसानंतर हवामानातील बदलामुळे मुंबईकरांची तब्येत खराब होऊ शकते

मुंबई : कडकडीत उन्हामुळे मुंबईकरांची लाही लाही होत होती. पण पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुंबईकर सुखावले आहेत. पावसानंतर हवामानातील बदलामुळे मुंबईकरांची तब्येत खराब होऊ शकते. यावेळी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण ताप अंगावर काढल्यास मुंबईकरांना मलेरिया, डेंग्यू किंवा स्वाइन फ्लू अथवा लेप्टो होण्याचा धोका आहे.गेल्यावर्षी जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर मुंबईत लेप्टोची साथ पसरली होती. गेल्या दोन दिवसांत मुंबईत झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले होते. पायाला जखम असताना साठलेल्या पाण्यातून चालत गेल्यास लेप्टोस्पायरा हे विषाणू शरीरात जाण्याचा धोका असतो. आणि त्यामुळे लेप्टाची लागण होऊ शकते. पुढच्या काही दिवसांत ताप आल्यास तो अंगावर काढू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. कोणालाही ताप आला असेल तर तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. रक्त तपासणी करावी. कारण साथीच्या आजाराचे प्राथमिक पातळीवर निदान झाल्यास आजार लवकर बरा होतो आणि गुंतागुंत होत नाही. डॉक्टरकडे गेल्यावर साचलेल्या पाण्यातून चालत गेले असल्यास तेही नक्की सांगा, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केले आहे. घराभोवती स्वच्छता ठेवा. एसीमधील पाणी काढून टाका, करवंट्या, अडगळीच्या ठिकाणच्या वस्तू काढून टाका, गच्ची स्वच्छ करून घ्या, पाणी साठू देऊ नका, स्वच्छता ठेवा, असेही डॉ. केसकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी) महापालिका पाच महिन्यांपासून प्रयत्नशीलपावसाळा सुरु होण्याआधीच साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने चांगलीच कंबर कसली होती. डेंग्यू, मलेरिया हे साथीचे आजार साठलेल्या पाण्यात उत्पत्ती होणाऱ्या डासांमुळे होतात. टायर, ताडपत्री, अडगळीच्या वस्तूंमध्ये पावसाळ््यात पाणी साचण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत महापालिकेने डास प्रतिबंधासाठी महापालिकेने शहरातील ३ हजार १७५ टायर्स हटविले. तर, १ लाख ८८ हजार ६१६ वस्तू देखील काढून टाकल्या. टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या विविध वस्तुंमध्ये पावसाचे अथवा इतर पाणी साचते. यामध्ये अगदी थोड्याप्रमाणात साचलेल्या अथवा असणाऱ्या पाण्यात देखील डास अंडी घालतात. त्यामुळे गेल्या ५ महिन्यांपासून महापालिका कार्यवाही करत होती. या कार्यवाहीत ‘जी दक्षिण’ आणि ‘एम पश्चिम’ विभागात सर्वाधिक म्हणजे ३१६ टायर हटविण्यात आले आहेत. त्या खालोखाल ‘एम पूर्व’ विभागातून २५७ आणि ‘आर उत्तर’ २४५ टायर हटविण्यात आले आहेत. तर सर्व २४ विभागातून ३ हजार १७८ टायर हटविण्यात आले आहेत. तर, ३० हजार ४२३ वस्तू ‘जी उत्तर’ विभागातून हटविण्यात आल्या आहेत. खालोखाल २८ हजार १९८ वस्तू या ‘इ’ विभागातून हटविण्यात आल्या आहेत. २४ विभागातून १ लाख ८८ ६१६ इतर वस्तू हटविण्यात आल्या आहेत. हे जरूर करापाणी उकळून, गाळून प्या, ताजे शिजलेले अन्न खा, खाण्याआधी हात स्वच्छ धुवा, साचलेल्या पाण्यातून चालू नका, पायाची जखम उघडी ठेवू नका, बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा, घराच्या परिसरात साचलेले पाणी काढून टाकाहे टाळा! न शिजवलेले पदार्थ खाऊ नका, चटणी खाणे टाळा, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, स्टॉल्स, खाण्याच्या गाड्यांवरचे पाणी पिऊ नका, ताप २ ते ३ दिवसांपर्यंत अंगावर काढू नका, स्वत:च औषधे घेणे टाळा, पावसात अधिक काळ भिजू नका पावसाळ््यात होणारे आजार ताप : लक्षणे - कणकण, सुस्ती येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, उदासीनता येणेलेप्टोस्पायरसिस : लक्षणे - थंडी वाजणे, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, पोटदुखी, डोळे लाल होणे, काहीवेळा त्वचेवर रॅश येणेस्वाइन फ्लू : लक्षणे - सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखी गॅस्ट्रो : लक्षणे - पोटाच्या वरच्या भागात दुखणे, अन्नावरची इच्छा उडणे, उलट्या, ढेकरा येणे, भूक मंदावणेकावीळ : लक्षणे - अस्वस्थता वाटणे, सांधे दुखी, ताप, उलट्या किंवा अन्नावरची इच्छा उडणे, डोकेदुखीटायफॉइड : लक्षणे - भूक कमी लागणे, डोकेदुखी, अंगदुखी, ताप (४ डिग्रीपर्यंत जाऊ शकतो), सुस्तपणा येणे, उलट्या होणे, अन्नावरची इच्छा उडणेकॉलरा : लक्षणे - जुलाब, डायरिया, अशक्तपणा येणे, डिहायड्रेशन, पोटदुखीडासांमुळे होणारे आजार मलेरिया : लक्षणे - ताप, थंडी वाजणे, सांधे दुखणे, उलट्या होणे डेंग्यू : लक्षणे - ताप, स्नायू दुखणे, सांधे दुखी, डोके दुखी, अन्नावरची इच्छा उडणे, पुरळ उठणे चिकनगुनिया : लक्षणे - आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक काळ ताप येणे, डोकेदुखी, तीव्र सांधेदुखी, अन्नावरची इच्छा उडणे किंवा उलट्या होणे, डोळ््यांचा दाह होणजून २०१५ आजाररुग्णमलेरिया६०९डेंग्यू३८टायफॉइड१०२गॅस्ट्रो१०२३लेप्टो ४कावीळ९९२० जून २०१६आजाररुग्णमलेरिया२८०डेंग्यू२७टायफॉईड७९गॅस्ट्रो५७९लेप्टो ६कावीळ८२