शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मेट्रो घेणार भरारी

By admin | Updated: August 21, 2014 01:21 IST

उपराजधानीला विकासाचा नवा चेहरा देणारा आणि वाहतूक कोंडी दूर करण्यात मोलाची भूमिका बजावणारा ८ हजार ६८० कोटी रुपयांचा ३८.३१ कि.मी. लांबीचा बहुप्रतीक्षित नागूपर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे

पंतप्रधान करणार भूमिपूजन: उपराजधानीच्या विकासाला बळ नागपूर : उपराजधानीला विकासाचा नवा चेहरा देणारा आणि वाहतूक कोंडी दूर करण्यात मोलाची भूमिका बजावणारा ८ हजार ६८० कोटी रुपयांचा ३८.३१ कि.मी. लांबीचा बहुप्रतीक्षित नागूपर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे गुरुवारी २१ आॅगस्टला सायंकाळी ५.४५ वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कस्तूरचंद पार्कवर जाहीर कार्यक्रमात भूमिपूजन होणार आहे. याच कार्यक्रमात पारडी नाका उड्डाण पूल,नवीन रस्ता दुभाजकासह इतरही कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्यासह केंद्रीय नगर विकास मंत्री एम.वेंकय्या नायडू, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्राम विकास मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्यासह अन्य मंत्री आणि राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते तसेच केंद्र आणि राज्यातील ऊर्जा, नगर विकास आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित राहतील. हा कार्यक्रम शासकीय असला तरी त्याला जाहीर कार्यक्रमाचे स्वरूप देण्यात आले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने कार्यक्रमाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. या कार्यक्रमाला एक लाख लोक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने कस्तूरचंद पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. ५० हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. एक हजारावर सोफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. टप्प्प्यावर पोलीस तैनात करण्यात आले आहे. सायंकाळी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सभेच्या तयारीचा आढावा घेतला. भारतीय जनता पक्षानेही या कार्यक्रमाची एक आठवड्यापासून तयारी सुरू केली आहे. प्रत्येक मतदारसंघातून १५ ते २० हजार लोकांना सभास्थळी आणण्याचे लक्ष्य निर्धारित करून देण्यात आले आहे. बुधवारी दुपारी महापौर आणि आमदार अनिल सोले, शहर अध्यक्ष व आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे यांच्यासह अन्य नेत्यांनी कस्तूरचंद पार्कला भेट दिली व व्यवस्थेची पाहणी केली. सुरक्षा अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. प्रव्ीण दराडे, पोलीस आयुक्त के.के. पाठक उपस्थित होते.४० अधिकाऱ्यांचे सुरक्षा कवच पंतप्रधान मोदी यांच्याभोवती एसपीजी आणि एसपीयूंच्या ४० अधिकाऱ्यांचे सुरक्षा कवच राहणार आहेत. एसपीजीच्या बाजूला पोलिसांचा गराडा राहील. गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त सुनील कोल्हे हे कॅन्वाय मार्शलची जबाबदारी सांभाळणार आहेत. वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी ट्रॅफिक डीसीपी भारत तांगडे सांभाळतील. विमानतळावरचा बंदोबस्त परिमंडळ एकचे उपायुक्त अभिनाशकुमार हाताळणार आहेत. राजभवनाच्या सुरक्षेचा बंदोबस्त पोलीस उपायुक्त विजय पवार सांभाळतील. असा आहे दौैरावेळ कार्यक्रमदु.३.०५ रांची येथून नागपूर विमानतळावर आगमन३.१० हेलिकॉप्टरने मौद्याकडे प्रयाण३.३५ मौदा हेलिपॅडवर आगमन३.४५ ते ४.४५ मौदा औष्णिक वीज प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे देशाला लोकार्पण५ वा. मौदा येथून नागपूरकडे प्रयाण५.२५ नागपूर विमानतळावर आगमन५.३० कस्तूरचंद पार्ककडे कारने रवाना५.४५ कस्तूरचंद पार्कवर आगमन५.४५ ते ६.४५कस्तूरचंद पार्कवर कार्यक्रमात उपस्थितीरात्री ७.१० नागपूरहून दिल्लीकडे प्रयाणमौदा वीज प्रकल्पाचे आज लोकार्पणनॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या (एनटीपीसी) मौदा येथील सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या एक हजार (५०० मे.वॅ.चे दोन युनिट) मे.वॅ.च्या पहिल्या टप्प्याचे गुरुवारी दुपारी ३.४५ वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५४५९ कोटी रुपयांची गुंतवणूक असून दुसऱ्या टप्प्यासाठी ७९२१ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. मौदा प्रकल्पाच्या पहिल्या युनिटचे कार्यान्वयन मार्च २०१३ पासून तर दुसऱ्या टप्प्याचे कार्यान्वयन मार्च २०१४ पासून सुरू झाले. या प्रकल्पातून महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश,छत्तीसगड, गोवा आणि जम्मू काश्मीर या राज्यांसह दीव-दमण, दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांनाही वीजपुरवठा करण्यात येणार आहे. एनटीपीसीचा हा राज्यातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल के. शंकरनारायणन,मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे व खासदार कृपाल तुमाने यांच्यासह एनटीपीसीचे मुख्य प्रबंध संचालक डॉ. अरुप रॉय चौधरी, संचालक (संचालन) एन.एन.मेश्राम,संचालक (मानव व संसाधन) यु.पी.पाणी, कार्यकारी संचालक (पश्चिम क्षेत्र) जी.जे. देशपांडे, मौदा प्रकल्पाचे समूह महाप्रबंधक व्ही. थंगापाडियन व इतरही नेते उपस्थित राहणार आहेत.