शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कारासाठी न गेल्याने कुुटुंब ७ वर्षे बहिष्कृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 22:54 IST

एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला कोणी उपस्थित न राहिल्याने एका कुटुंबाला समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या सात वर्षापासून

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 21 : एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला कोणी उपस्थित न राहिल्याने एका कुटुंबाला समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या सात वर्षापासून बहिष्कृत करण्यात आल्याचे घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अखिल महाराष्ट्र घडशी समाजाच्या नऊ पदाधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक बहिष्कार केल्याप्रकरणी शनिवारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार पिडीताने त्याविरुद्ध पोलिसांत धाव घेतल्याने या प्रकाराला वाचा फुटली आहे. सामाजिक बहिष्कारापासून संरक्षणासाठी गेल्यावर्षी कायद्याची निर्मिती केल्यानंतर याबाबत मुंबईत दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे. आता यातील संशयित आरोपीवर पोलीस कधी कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.दादर (प) येथील शिवाजी मंदिराजवळील स्वाती मनोर हौसिंग सोसायटीमध्ये रहात असलेले प्रभाकर जिजाबा भोसले (वय ६५) हे इतर मागासवर्गियातील घडशी समाजातील आहेत. सनई चौघडा वाजविण्याचा त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे. २०१०मध्ये एका नातेवाईकाचा मृत्यू झाला होता. मात्र काही कारणानिमित्य ते त्याच्या अंत्यसंस्काराला जावू शकले नव्हते. ही बाब घडशी समाजाच्या पदाधिकाऱ्यांना जिव्हारी लागली. त्यामुळे त्यांनी प्रभाकर भोसले व त्यांच्या कुटुंबियाला समाजापासून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला. गेली ७ वर्षे समाजाचे कोणीही त्यांच्याशी कसलाही व्यवहार करीत नसून संपर्क तोडलेला आहे. समाजाच्या कार्यक्रमात त्यांना सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या बहिष्कारामुळे अपमानास्पद वाटत असल्याने अखेर भोसले यांनी त्याबाबत समाजातील ९ पदाधिकारी व सदस्याविरुद्ध शिवाजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.