शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महिला होमगार्डला मारहाण

By admin | Updated: March 20, 2017 03:48 IST

डोंबिवलीत रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच असून त्याचा प्रत्यय आज महिला होमगार्डला आला.

डोंबिवली : डोंबिवलीत रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच असून त्याचा प्रत्यय आज महिला होमगार्डला आला. मुजोर रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या या होमगार्डला ठाकुर्लीच्या दिशेने नेले आणि मारहाण करून नाल्यात ढकलून दिले. हा प्रकार रविवारी दुपारी बाराच्या दरम्यान घडला. मारहाण झालेल्या होमगार्डचे नाव सुनीता नंद मेहर (३०) आहे. मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली असून रवी गुप्ता (२७) असे त्याचे नाव आहे. वाहतूक पोलीस व शहर पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने राज्य सरकारकडून त्यांना होमगार्ड पुरविले जातात. त्यांना भत्ता दिला जातो. डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यासमोर रिक्षाचालक रवी गुप्ता याने रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभी केली होती. ती तेथेच आडवी करून तो एकाशी गप्पा मारत होता. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तेथे ड्युटीवर असलेल्या होमगार्ड मेहर यांनी त्याला मज्जाव करीत ‘रिक्षा रस्त्याच्या बाजूला घे’ असे सांगितले. त्यावर रिक्षाचालक संतापला. त्याने होमगार्डच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून अरेरावीची भाषा सुरू केली. त्यामुळे मेहर त्याच्या रिक्षात बसल्या आणि कारवाईसाठी ‘रिक्षा पोलीस ठाण्याला घे’ असे त्यांनी सांगितले. पण गुप्ता याने रिक्षा पोलीस ठाण्याकडे न घेता थेट ठाकुर्लीच्या दिशेने पळविण्यास सुरुवात केली. मेहर यांना उतरण्याची संधी न देता त्याने रिक्षा पळवली. त्याचा कावा लक्षात आल्याने त्यांनी त्याला रिक्षा थांबविण्यास सांगितले, पण त्याने ठाकुर्लीनजीक रिक्षा नेली आणि तेथे तो रिक्षातून खाली उतरला. त्याने होमगार्ड मेहर यांना जबर मारहाण केली. त्यावर न थांबता त्याने त्यांना नाल्यात ढकलून दिले. या मारहाणीत मेहर यांच्या हाताला आणि पायाला जबर दुखापत झाली. हा प्रकार पाहून नागरिक तेथे धावताच गुप्ता तेथून पळाला. मेहर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रिक्षाचालक गुप्ता याला अटक केली.(प्रतिनिधी)