ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. 5 - महानगरपालिका आणि जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देईल असा नारा आम्ही औरंगाबाद येथून दिला होता. यामुळे भाजपा सरकार हादरले, सरकार पडले आणि मध्यावधी निवडणुका झाल्या तर आपण भुईसपाट होवू अशी घबराट निर्माण झाल्याने आपली खुर्ची वाचविण्यासाठी भाजपाने मुंबई महापालिकेमध्ये महापौर व इतर कोणत्याही पदासाठी उमेदवार देणार नाही असा निर्णय घेतला आहे. जनतेशी भाजपाला काहीच देणे घेणे नाही आपल्या स्वार्थासाठी आणि सत्ता अबाधित ठेवण्यासाठीच भाजपाची धडपड सुरु आहे. ही तर सत्तेसाठी भाजपाची लाचारी आहे अशी टीका आमदार अब्दुल सत्तार यांनी केली.
एक जीतसे कोई सिकंदर नही बनता...तो एक हार से कोई फकीर नहीं बनता...- सत्तार
कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार हे बहुतांश ठिकाणी बहुमतांणी निवडून येणार असेच चित्र सर्वत्र होते. मतदानाच्या मध्यरात्री भाजपकडून भरमसाठ पैसा वाटला गेल्याने आमच्या सोबत घात झाला.यामुळे कॉंग्रेसच्या बऱ्याच सदस्यांना पराभव पत्कारावा लागला. कोंग्रेसच्या ज्या इचुकांचे तिकीट कापन्यात आले.त्या पैकी काहिनी उमेदवारांना पाडण्याचे काम केले.एक जीत से कोई सिकंदर नही बनता... एक हार से कोई फकीर नहीं बनता...असा दिलासा कार्य कर्त्याना देवून कॉंग्रेसचा झालेल्या अनपेक्षित पराभवासाठी आत्मचिंतन करावे लागेल.. असे स्पष्ट करुन भाजपचा विजय जनशक्तिचा नसून धनशक्तिचा असल्याचा आरोप माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी केले.