शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कमी सौर वादळांमुळे मान्सून कमकुवत होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 06:02 IST

सूर्यावरील सौर वादळे आणि मान्सून याचा निकटचा संबंध असून यंदाचे वर्ष हे किमान सौर डागांच्या वादळांचे वर्ष आहे.

विवेक भुसेपुणे : सूर्यावरील सौर वादळे आणि मान्सून याचा निकटचा संबंध असून यंदाचे वर्ष हे किमान सौर डागांच्या वादळांचे वर्ष आहे़ त्यामुळे यंदा सुरुवातीला मान्सून कमजोर होण्याची दाट शक्यता असून परिणामी सुरुवातीला पाऊस कमी राहील, असा दावा अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे़जोहरे हे पाषाण येथील भारतीय उष्ण प्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेत १२ वर्षे मान्सूनवर अभ्यास करीत होते़ तसेच सौर डाग आणि मान्सूनचा संबंध यावर गेली १७ वर्षे अभ्यास करीत आहेत़ जोहरे यांनी सांगितले, सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरुपातच नव्हे तर विद्युत चुंबकीय क्षेत्रात देखील बदल घडवून आणते़ पृथ्वीचे चुंबकीय आवरण वातावरण संतुलनाचे कार्य करते़ जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त व परिणामी सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त, असे ढोबळमानाने म्हणता येईल. (२०१८) हे २४ क्रमांकाच्या आवर्तनाचे व किमान सौर डागांच्या वादळांचे वर्ष आहे. बेल्जियमच्या सोलर इन्फ्लुअन्सेस डाटा अ‍ॅनालिसीस सेंटर, (एसआयडीएस) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्यात. यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे निघाल्याची माहिती मिळते. याचा थेट परिणाम मान्सूनवर होतो, असे आढळले आहे. सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य मान्सून कमजोर होण्याची शक्यता आहे़पंतप्रधान कार्यालय, आयएमडीला आधीच दिला होता इशाराजोहरे यांनी निष्कर्षाची कल्पना पंतप्रधान कार्यालय व भारतीय हवामान विभागाला ४ एप्रिल रोजी दिली होती़ पंतप्रधान कार्यालयाने ते हवामान विभागाकडे पाठवून त्यांचे मत मागविले होते़ त्यानुसार दिल्लीतील हवामान विभाग कार्यालयातील शास्त्रज्ञ कुलदीप श्रीवास्तव यांनी हवामान विभागाचा अंदाज बरोबर असल्याचे मत व्यक्त केल्याने कार्यालयाने १३ जून रोजी जोहरे यांची फाईल बंद केली़