शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थानातील प्रसादावर ‘एफडीए’ची नजर; सुरक्षित अन्न पुरवठ्याबाबत प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:20 IST

देवस्थानामधून दिल्या जाणाºया महाप्रसादावर आता अन्न, औषध प्रशासनाचे लक्ष राहणार आहे़ अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणेच भाविकांना प्रसाद मिळण्यासाठी मंदिरात १४ ते १६ सप्टेंबर अन्न, औषध प्रशासनातर्फे विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे़

अहमदनगर : देवस्थानामधून दिल्या जाणाºया महाप्रसादावर आता अन्न, औषध प्रशासनाचे लक्ष राहणार आहे़ अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणेच भाविकांना प्रसाद मिळण्यासाठी मंदिरात १४ ते १६ सप्टेंबर अन्न, औषध प्रशासनातर्फे विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे़जिल्ह्यात शिर्डी येथे जगप्रसिद्ध देवस्थान आहे़ तसेच शनिशिंगणापूर, मढी, मोहटा, सिद्धटेक, देवगड, कोरठण खंडोबा, मांदळी आदी देवस्थानांच्या ठिकाणी भाविकांसाठी सतत महाप्रसादाचे आयोजन केले जाते. भाविकांना स्वच्छ, निर्भेळ व दर्जेदार महाप्रसाद मिळणे अपेक्षित आहे़ त्यासाठी अन्न बनविताना घ्यावयाची काळजी, बनविलेले अन्न कधीपर्यंत सेवन करता येते, स्वच्छता कशी राखावी आदीबाबत राज्यातील देवस्थानांमध्ये कार्यशाळा घेऊन प्रबोधन करण्याचे आदेश अन्न, औषध प्रशासन आयुक्तांनी दिले आहेत़ अन्न तज्ज्ञ उमेश कांबळे हे देवस्थानचे अध्यक्ष, ट्रस्टी व कर्मचाºयांना मार्गदर्शन करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त बालू ठाकूर यांनी सांगितले़मंदिराबाहेरील विक्रेत्यांचेही प्रबोधन : मंदिराबाहेर अन्नपदार्थ विक्री करणाºया विक्रेत्यांना अन्न परवाना सक्तीचा आहे़ तसेच त्यांचेही प्रबोधन केले जाणार आहे़