शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

बापरे ! भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी थकवलं अडीच लाखांचं वीजबिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 18:39 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आता नवीन वादात अडकले आहेत. रावसाहेब दानवे यांनी तब्बल 83 महिन्यांचे वीजबिलच भरले नसल्याचे वृत्त समोर आले आहे.

मुंबई, दि. 12 - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आता नवीन वादात अडकले आहेत. दानवेंनी महावितरणचे तब्बल अडीच लाख रुपयांचे वीजबिल थकवले आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार,  दानवेंचे भोकरदनमधील घराचे गेल्या 83 महिन्यांपासूनचं वीजबिल थकलेले आहे. विशेष म्हणजे महावितरणनंही अद्यापपर्यंत दानवेंवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये घर आहे. गेल्या 83 महिन्यांपासून महावितरणचे तब्बल 2 लाख 59 हजार 176 रुपयांचे वीजबिल दानवेंनी थकवले आहे. फक्त जुलै महिन्यातच दानवेंकडे 29 हजार 595 हजारांची थकबाकी आहे.

83 महिन्यांपासून दानवेंची लाखोंची थकबाकी असूनही कोणतीही कारवाई न केल्यामुळे महावितरणच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्यांनी जर वीजबिल भरले नाही तर महावितरण तातडीनं त्यांची वीजजोडणी कापते. 

रावसाहेब दानवे आणि त्यांचे वाद

तूर खरेदीवरुन दानवेंचं वादग्रस्त विधान यापूर्वी तूरडाळ खरेदीवरुन शेतक-यांप्रती असभ्य भाषा वापरल्याप्रकरणी रावसाहेब दानवे अडचणीत आले होते. एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात 'साले', असं म्हणत रावसाहेब दानवेंनी शेतक-यांची एक प्रकारे अवहेलना केली होती. जालन्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले होते की, ''इतकी तूर खरेदी करूनही यांचे रडगाणे सुरूच आहे, दर नाही दर नाही असली रडगाणी आता बंद करा.'' कापूस, तूर आणि डाळीला भाव नाही असली रडगाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली होती. यावेळी भाजपाच्या एका कार्यकर्त्यानं दानवेंना तूर खरेदीबाबत लोकांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न केला असता त्याला प्रत्युत्तर देताना दानवेंची जीभ घसरली. राज्य सरकारनं एक लाख टन तूर खरेदी केली तरी लोक रडतात साले, असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यावरच आगपाखड केली होती.  याआधीही रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. 

नोटाबंदी केल्यानंतर दानवे म्हणाले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर सर्वांना धक्का बसला. मात्र, तुमच्याकडे नोटा असतील तर माझ्याकडे द्या, मी बदलून देतो आणि आपल्याजवळ कुठे नोटा बंद आहेत?. तसेच गेल्या वर्षी अख्ख्या मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, मात्र आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो की, खूप दुष्काळ आहे. माणसं स्थलांतर करत आहेत, जनावरं मरत आहेत आणि हे खोटे चित्र उभे आम्ही करत होतो. याचा परिणाम असा झाला की 68 वर्षांत पहिल्यांदा 4200 कोटींची मदत मिळाली, असं धक्कादायक वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं होतं. पैठणमधील एका प्रचारसभेत बोलताना रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 

मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा, असंही वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वीच रावसाहेब दानवेंनी विरोधकांना उद्देशूनही बेजबाबदार विधान केलं होतं. कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असं दानवे म्हणाले होते.