शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते भरत जाधव यांना पितृशोक

By admin | Updated: April 21, 2017 22:48 IST

आधारवड कोसळला, आज अंत्यसंस्कार

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते भरत जाधव यांचे वडील गणपत हरी जाधव (वय ८७, राहणार काशीद कॉलनी, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) यांचे शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर आज, शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्वत: टॅक्सीचालक असणाऱ्या जाधव यांनी अत्यंत कष्टातून भरत जाधव यांचे करिअर घडविले. त्यामुळे जाधव कुटुंबीयांचा आधारवड कोसळल्याची भावना व्यक्त झाली. जाधव हे पत्नी शांता तसेच पुतणे यांच्यासोबत साने गुुरुजी वसाहत येथील घरात राहत होते. वयोमानामुळे त्यांना प्रकृतीचा किरकोळ त्रास होता. शुक्रवारी रात्री साडेसात वाजता त्यांना थोडे अस्वस्थ वाटू लागले. रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरू असतानाच आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त भरत यांच्यासह त्यांचे भाऊ किरण व राजू जाधव व बहीण छाया यांना कळविण्यात आले. मात्र ते मुंबईला असल्याने रात्रीच कोल्हापूरला निघाले. आज, शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे. गणपत जाधव हे व्यवसायाने टॅक्सीचालक होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. त्यांनी केलेल्या संस्कारांमुळे भरत जाधव यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले करिअर केले. भरत आणि दोन्ही भाऊ मुंबईला राहत असले तरी दर आठवड्याला कोल्हापुरात येऊन ते वडिलांची चौकशी करून त्यांच्यासोबत वेळ घालवून जायचे. भरत यांचा वडिलांवर अतिशय जीव होता. वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी दहा वर्षांपूर्वी साने गुरुजी वसाहत येथे बंगला विकत घेतला होता. (प्रतिनिधी) व्ही. शांताराम यांचे चालक ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही. शांताराम कोळेकर तिकटी येथे राहायचे; तर गणपत जाधव यांचे बेलबागेत घर होते. व्ही. शांताराम कोल्हापुरातून मुंबईला स्थायिक झाल्यानंतर त्यांनी आपल्यासोबत जवळच्या माणसांनाही नेले. त्यात जाधव यांचा समावेश होता. नंतर ते व्ही. शांताराम यांच्या गाडीचे चालक म्हणून काम करू लागले. कोल्हापूर हे मूळ गाव आणि जोतिबा कुलदैवत त्यामुळे वृद्घापकाळात त्यांनी कोल्हापुरातच राहणे पसंत केले. -----------------