मुंबई : भाजपा सेना युती तुटल्यानंतर विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांचा मंत्रालयासमोरील बंगला राजकीय घडामोडींचे केंद्र बनला. युतीमुळे ज्यांना तिकीट मिळणार नव्हते, त्यांच्या आशा युती तुटल्यामुळे पल्लवित झाल्या. अनेक इच्छुक उमेदवार भाजपातर्फे लढण्यासाठी त्यांना येऊन भेटत होते.केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रूडी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आदींसोबत त्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. रात्री उशिरा रिपाइं नेते रामदास आठवले त्यांच्या समर्थकांसह चर्चेसाठी येथे आले होते. औरंगाबादचे किशनचंद तनवानी यांनी देखील फडवणीस यांची भेट घेतली. (विशेष प्रतिनिधी)
भाजपाच्या गोटात वेगवान हालचाली सुरू
By admin | Updated: September 26, 2014 03:27 IST