शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

शेतकरी कर्जमाफीसाठी दिवाळीचा मुहूर्त हुकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 03:49 IST

कर्जमाफीसाठी शेतक-यांची नावे सरकारी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम राज्यात अवघे ११ टक्केच झाले आहे. दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा केली जाईल

अरुण बारसकर सोलापूर : कर्जमाफीसाठी शेतक-यांची नावे सरकारी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम राज्यात अवघे ११ टक्केच झाले आहे. दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे ढोल राज्यकर्ते बडवत असले तरी तांत्रिक कामांना होणारा विलंब लक्षात घेता दिवाळीचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने शेतकºयांचे कर्ज माफ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. यासाठी थकबाकीदार व नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करावयाचे होते. या कालावधीत ६९ लाख शेतकºयांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकांचे ३६ लाख २३ हजार ६२५ शेतकरी सभासद आहेत. आॅनलाइन अर्ज भरलेल्या शेतकºयांचे विकास सोसायटीच्या सचिव व बँक कर्मचाºयांनी एक ते ६६ कॉलममध्ये माहिती भरावयाची होती. ही माहिती सहकार खात्याच्या लेखापरीक्षकाकडून तपासणी करुन संस्थांनी जिल्हा बँकेकडे आॅनलाइन पाठवायची आहे. संस्थांकडून आलेली माहिती जिल्हा बँकांनी कर्जमाफीच्या लाभासाठी शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावयाची आहे. राज्यभरात एकाच वेळी हे काम सुरू असून अपलोड माहिती तपासल्यानंतर निकषात बसत असेल तरच संबंधित शेतकºयाच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.सोमवारपर्यंतच्या माहितीनुसार सोलापूर जिल्हा बँकेने पोर्टलवर ७८८ विकास सोसायट्यांची ८०,०८८ शेतकºयांची तर नाशिक जिल्हा बँकेने ५१२ विकास सोसायट्यांच्या ३८ हजार तर बुलडाणा जिल्हा बँकेने ५०९ विकास संस्थांच्या ११ हजार ५७९ शेतकºयांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे.७० टक्केच लेखापरीक्षणएक ते ६६ कॉलम माहिती भरण्याचे कामही अनेक जिल्ह्यांत अपूर्ण असून, आतापर्यंत सरासरी ७० टक्केच काम झाल्याचे सहकार खात्याकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरी