शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नगरच्या शेतकरी संपाचा राज्यभर वणवा पेटणार

By admin | Updated: April 12, 2017 01:12 IST

शेतकरी संपाच्या चळवळीला इतर जिल्ह्यातून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता नगरच्या शेतकरी संपाचा वणवा राज्यभर पेटण्याची चिन्हे आहेत़ घोंगडी बैठकांना

अहमदनगर : शेतकरी संपाच्या चळवळीला इतर जिल्ह्यातून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता नगरच्या शेतकरी संपाचा वणवा राज्यभर पेटण्याची चिन्हे आहेत़ घोंगडी बैठकांना वेग आला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या ७०वर पोहोचली असून, शेजारच्या नाशिक, औरंगाबाद, धुळे, नांदेड, परभणी, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या संपर्कात आहेत़ १ जून रोजीचा संप यशस्वी होईल, असा विश्वास कोअर कमिटीने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे़ वाढता उत्पादन खर्च आणि कोसळलेला शेतीमालाचा भाव, यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे़ आता संघटनांना बाजूला ठेवून शेतकऱ्यांनीच सरकारविरोधात लढा उभारला आहे़ राहाता तालुक्यातील पुणतांबा ग्रामपंचायतीच्या ३ एप्रिलच्या ग्रामसभेत संप करण्याचा ठराव शेतकऱ्यांनी केला़ ठिकठिकाणचे शेतकरी संपाचे नेतृत्व करणाऱ्या कोअर कमिटीशी संपर्क साधत आहेत़ नाशिक, धुळे, परभणी, बीड, सोलापूर, सांगली येथील शेतकऱ्यांनी विचारणा केली आहे़ नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे बुधवारी बैठक आहे़ ग्रामपंचायतींत २ मे रोजी ठराव करून ते तहसीलदारांना सादर केले जाणार आहेत, अशी माहिती सुहास वहाडणे, सर्जेराव जाधव, धनंजय जाधव, गणपत वाघ, डॉ़ धनंजय धनवटे यांनी दिली. (प्रतिनिधी)राजू शेट्टी करणार शेतकऱ्यांशी चर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी शुक्रवारी पुणतांबा गावात येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत़ तसेच रघुनाथ दादा पाटील, कृषक संघटनेच्या अध्यक्षा तथा श्रीरापूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक आणि नगर तालुक्यातील माजी खा. दादा पाटील शेळके यांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे.