लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शेतकरी संपाचा वणवा पेटला असला, तरी अद्याप त्याच्या झळा मुंबईला बसलेल्या नाहीत. मात्र पुढील तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहिल्यास रमजानवर त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.पुढील काही दिवस पुरेल इतका साठा फळ विक्रेत्यांकडे आहे. मात्र पुढील तीन दिवस आवक थांबल्यास त्याचा परिणाम रमजानवर होण्याची शक्यताही फळ विक्रेत्यांनी व्यक्त केली. तर शेतकऱ्यांशी चर्चा झाली असून भाजीपाल्याची आवक यापुढेही सुरळीत राहील, असा विश्वास भायखळा मार्केटचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी व्यक्त केला आहे.
शेतकरी संपाचा रमजानवर परिणाम!
By admin | Updated: June 2, 2017 03:16 IST