शिर्डी : सरकारने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कर्जमाफीची गुढी उभारुन बळीराजाला दिलासा द्यावा; अन्यथा शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिला.राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी सभागृहात सुरू असलेला लढा आता आम्ही रस्त्यावर नेणार असून, त्यासाठीच संघर्ष यात्रेचे नियोजन केले आहे. सरकारला अजूनही कर्जमाफीचा निर्णय घेण्याची संधी आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
शेतकरी धडकणार मंत्रालयावर - विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2017 03:16 IST