मुरुड (जि. लातूर) : दुष्काळामुळे कठीण परिस्थितीत उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील मुलीने लग्नासाठी आपले वडील हुंडा कोठून आणणार, या चिंतेतून बुधवारी थेट आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.मोहिनी पांडुरंग भिसे (१८, रा़ भिसे वाघोली, ता़लातूर) हिला पाहण्यासाठी येणारे तिच्या वडिलांकडे हुंडा किती देणार, अशी विचारणा करायचे. घरातील हलाखीची परिस्थिती मोहिनीला माहिती असल्याने वडिलांना हुंडा देणे शक्य नसल्याचे तिला माहीत होते. त्यातून तिने बुधवारी दुपारी ४ वाजता घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली़ मी आनंदाने मृत्यूला स्वीकारत असल्याचे तिने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे़ पांडुरंग भिसे यांना केवळ एक एकर,चार गुंठे शेती आहे़ त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने ते बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम करतात़ पाहुण्यांकडून मात्र हुंडा किती देणार, असा प्रश्न विचारला जात होता़ त्यामुळे ती चिंतेत होते.
शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या
By admin | Updated: January 21, 2016 03:56 IST