शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मोदींकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: May 23, 2017 03:22 IST

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उच्च प्रशासकीय अधिकारी सत्तेचा माज चढल्याने शेतकऱ्यांविषयी असंवेदनशीलपणे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उच्च प्रशासकीय अधिकारी सत्तेचा माज चढल्याने शेतकऱ्यांविषयी असंवेदनशीलपणे वक्तव्य करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवले तेच खालीही खेचू शकतात, हे विसरू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, अशी टीकाही त्यांनी केली.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुणे ते मुंबईदरम्यान आत्मक्लेश पदयात्रेस सोमवारी महात्मा फुले वाडा येथून सुरूवात झाली. यावेळी शेट्टी बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव,रविकांत तनपुरे, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, तृतियपंथी संघटनेच्या लक्ष्मी त्रिपाठी आदी उपस्थित होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची लहान मुले-मुलीसुद्धा आत्मक्लेश यात्रेत सहभागी झाले आहेत. बाबा आढाव म्हणाले, शेतकरी आत्महत्या हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नसून देशातील शेतक-यांचा प्रश्न आहे.