शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

शेतकरी कर्जमाफी, तुरीवरून राजकारण पेटले

By admin | Updated: May 3, 2017 04:33 IST

तुरीचा राजकीय भडका उडणे आता सुरू झाले असून काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज राज्यपाल विद्यासागर राव

मुंबई : तुरीचा राजकीय भडका उडणे आता सुरू झाले असून काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज राज्यपाल विद्यासागर राव यांची राजभवनावर भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी केली. तर बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य द्वारासमोर कांदा अन् तूर फेकून आंदोलन केले. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. म्हणून कर्जमाफीची घोषणा करण्याकरता विधिमंडळाचे अधिवेशन तत्काळ घेण्याचे निर्देश राज्य शासनाला  द्या, असे साकडे विरोधकांनी  राज्यपालांना घातले. कृषी पंपांचे वीजबिल  माफ करण्याची मागणीही त्यांनी केली. तूरीच्या खरेदीतील गैरव्यवहारांकडे त्यांनी लक्ष वेधले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे  आ. जयंत पाटील, संयुक्त जनता  दलाचे आ.कपिल पाटील, पीरिपाचे  आ. जोगेंद्र कवाडे, काँग्रेसचे आ.भाई जगताप आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज अचानक मंत्रालयाच्या मुख्य द्वारासमोर कांदा, तूर, फळे फेकून आंदोलन केले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले नंतर व्यक्तिगत जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करा, कांद्याच्या निर्यातीसाठी अनुदान द्या, तूरडाळीच्या खरेदीत पणन, कृषी, नाफेडचे अधिकारी आणि संपूर्ण प्रक्रियेची सीआयडी चौकशी करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर यांनी केले. पंजाबराव पाटील, बी.जी.पाटील, भीमाशंकर बिराजदार, नितीन पाटील, माऊली हळणकर प्रामुख्याने सहभागी झाले. तूर खरेदी पाच दिवसांत पूर्ण करा : मुख्यमंत्रीशासनाच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी आणलेली तूर येत्या पाच ते सहा दिवसांत खरेदी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. या तूरखरेदीसाठी अतिरिक्त यंत्रणा राबवा आणि दोन पाळ्यांमध्ये काम करा, असे निर्देर्श त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. अमरावती विभागात सर्वाधिक तूर खरेदी बाकी असल्याचे लक्षात घेऊन खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. धारणीमध्ये अतिरिक्त केंद्र सुरू करण्यात आले असून आता एकूण ११ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. याशिवाय प्रत्येक केंद्रावर दहा वजनकाटे ठेवण्यात आले आहेत. पुरेशा प्रमाणात ग्रेडर उपलब्ध व्हावेत म्हणून कृषी विभागातील पर्यवेक्षक तसेच सहाय्यक निबंधक यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून तुरीचे जलद ग्रेडेशन करून खरेदी प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बारदाण्याची पुरेशी व्यवस्था करण्याचे तसेच साठवणुकीसाठी खाजगी गोदामांचे अधिग्रहण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.शिवसेनाही सरसावली : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली असताना आज शिवसेनेनेही तीच मागणी केली. त्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. जीएसटी अधिवेशन २० ते २२ मेपर्यंतजीएसटीसाठी राज्याचा कायदा करण्याकरता विधिमंडळाचे अधिवेशन आता २० ते २२ मे दरम्यान घेण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज या तारखा निश्चित केल्या. दोन दिवसांपूर्वी झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे अधिवेशन २१ ते २३ मे दरम्यान घेण्याची शिफारस करण्यात आली होती.