शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

देशातील शेतकऱ्यांना माती आरोग्यपत्रिका मिळणार!

By admin | Updated: November 4, 2015 02:19 IST

शेतकऱ्यांना पिकांचे अचूक नियोजन करण्यासाठी येत्या तीन वर्षांत देशातील शेतकऱ्यांना माती आरोग्यपत्रिका दिली जाणार आहे. त्यासाठीचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती

- राजरत्न सिरसाट,  अकोलाशेतकऱ्यांना पिकांचे अचूक नियोजन करण्यासाठी येत्या तीन वर्षांत देशातील शेतकऱ्यांना माती आरोग्यपत्रिका दिली जाणार आहे. त्यासाठीचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन अन्वेषणचे (आयसीएआर-एनबीएसएस-एलयूपी) संचालक डॉ. एस.के. सिंग यांनी मंगळवारी खास ‘लोकमत’शी बोलतानादिली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय मृद् व जल गुणवत्ता परिसंवादाला उपस्थित राहण्यासाठी डॉ. सिंग अकोला येथे आले असताना, त्यांनी मातीचे बिघडलेल्या आरोग्यावर चिंता व्यक्त केली. प्रश्न - मातीचे आरोग्य बिघडण्याचे कारण काय?उत्तर- देशात शेतमालाची उत्पादकता वाढली आहे. या उत्पादकतेला अधिक मात्रात पोषक माती तत्त्व लागतात. ते नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, बोरॉन आदी माती तत्त्व, सूक्ष्म अन्नद्रव्य कमी झाले आहेत. त्याचा परिणाम मात्र अलीकडे उत्पादकतेवर होेत आहे. प्रश्न - सूक्ष्म अन्नद्रव्य वाढविण्यासाठी उपाययोजना काय?उत्तर- यावर संशोधन सुरू असून, देशात माती परीक्षणाचे काम सुरू झाले आहे. या मातीचे पृथक्करण केल्यानंतर त्यात जे घटक कमी आहेत, ते बाहेरू न पुरवले जाणार आहेत. त्यासाठी देशातील शेतकऱ्यांना माती आरोग्यपत्रिका वितरित केली जाणार आहे.प्रश्न - माती आरोग्यपत्रिका देऊन उपयोग काय?प्रश्न - उपयोग आहे. म्हणून तर हा कार्यक्रम देशात राबविण्यात येत आहे. मातीचे आरोग्य कळाल्यास शेतकऱ्यांना योग्य पिकांची निवड करता येईल. कोणत्या मातीत कोणते घटक कमी आहेत, ते कळेल. जे पीक घ्यायचे असेल, त्यासाठी कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य, घटक लागतात, त्याचा समप्रमाणात बाहेरू न पुरवठा करू न उत्पादनात वाढ करता येईल. प्रश्न - आतापर्यंत माती आरोग्यपत्रिकेचे किती वितरण झाले?उत्तर - तेलंगण राज्यात जवळपास दीड लाख माती आरोग्यपत्रिका वितरित करण्यात आल्या असून, आयसीएआर-एनबीएसएस-एलयूपी अंतर्गत प्रादेशिक कार्यालयांतर्गत माती आरोग्यपत्रिका तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात येत आहे. प्रश्न - पावसाच्या पाण्यासोबत मातीसह वाहून जाणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यावर उपाययोजना काय?उत्तर- हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समोर आहे. पावसाच्या पाण्याबरोबर शेतातील माती तर वाहून जातेच, त्यासोबत मातीमधील महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य, घटक वाहून जात आहे. यासाठी माती व पाण्याचा समतोल राखण्यावर भर दिला जात आहे. यासाठीची माहिती रिमोट सेन्सिंगद्वारे एकत्रित करण्यात येत आहे. प्रश्न - खरीप हंगामातील शेतकरी अलीकडचे एकच पीक घेतोय ?उत्तर - देशात आणि महाराष्ट्रातदेखील ८० टक्के शेती कोरडवाहू आहे. यावर आमचे संशोधन सुरू असून, कोेरडवाहू आणि रेनफेड शेती विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. यापुढे कोरडवाहू शेतकऱ्यांना दोन पिके कशी घेता येतील, असेच प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कोेरडवाहू क्षेत्रात जलसंधारणाच्या कामांवर मुख्यत्वे भर देण्यात आला आहे. यासाठीही रिमोट सेन्सिंगचा वापर करू न माहिती गोळा केली जात आहे.प्रश्न - एकीकडे येणाऱ्या लोकसंख्येला लागणाऱ्या अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना, उत्पादकता कमी होेत आहे?उत्तर - यासाठीच साऱ्या उपाययोजना तयार करण्यात येत आहेत. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याची टंचाई भासू नये, यासाठी आयसीएआर अंतर्गत देशात अनेक कार्यक्रम आखले आहेत. माती परीक्षण व पत्रिका हा त्यातील महत्त्वाचा घटक आहे. माती व पाण्याचा समतोल यासाठी निर्माण करावा लागणार आहे. येत्या ५ डिसेंबरला आंतराष्ट्रीय मृदा दिवस साजरा केला जाणार आहे. त्यासाठी यावर्षी या सर्व बाबी गांभीर्याने घेण्यात आल्या आहेत.