शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांवरून गदारोळ

By admin | Updated: March 15, 2016 01:46 IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना द्यायच्या मुद्द्यावरून सोमवारी मदत व पुर्नवसनमंत्री एकनाथ खडसे आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. केवळ व्हिसेराचा

मुंबई : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना द्यायच्या मुद्द्यावरून सोमवारी मदत व पुर्नवसनमंत्री एकनाथ खडसे आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. केवळ व्हिसेराचा अहवाल मिळाला नसल्याचे कारण देत, सरकारने पन्नास टक्के आत्महत्याग्रस्तांना मदत नाकारल्याचा आरोप विरोधकांनी केला, तर गेल्या दहा वर्षांतील तुमची पापे आम्ही फेडतोय. तुमच्या चुकीच्या धोरणांची फळे शेतकऱ्यांना भोगावी लागत असल्याचा पलटवार खडसे यांनी केला. या गदारोळात विधान परिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकुब करावे लागले. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबतचा मुद्दा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. तब्बल ४५ सदस्यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. यावर बोलताना खडसे म्हणाले की, ‘राज्यात गेल्या वर्षभरात ३ हजार ३२८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी १८४१ आत्महत्या शेती संकटामुळे झाली असल्याने, कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणात व्हिसेरा अहवाल मिळाला नसल्याने, सदर प्रकरणे फेरतपासणीसाठी पाठविण्यात आली,’ असे खडसे यांनी सांगितले. खडसे यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरूकेली. आत्महत्याग्रस्तांना मदत करण्यासाठी व्हिसेराचा अहवाल लागतोच कशाला, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. व्हिसेरा अहवालाचे कारण देत मदत नाकारणे ही दिशाभूल असल्याचा आरोप करत, विरोधक सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले. या घोषणाबाजीनंतर खडसे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तुम्ही दहा वर्षे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. तुम्ही केलेली पापे आम्ही फेडतोय, असे त्यांनी विरोधकांना सुनावले. (प्रतिनिधी) आत्महत्येच्या प्रश्नावर ११ उपप्रश्नतारांकित प्रश्नाला किती उपप्रश्न असावे, याबाबत काही नियम संकेत आहेत. मात्र, आत्महत्येच्या या प्रश्नावर तब्बल ११ उपप्रश्न विचारण्यात आले. विधिमंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असावी, असे सांगत खडसेंनी नाराजी व्यक्त केली. यावर सभागृहातील तब्बल ४५ सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्याने, त्यांचे समाधान होणे महत्त्वाचे असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.