शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संप : सरकारी कार्यालयांना टाळेठोक आंदोलन

By admin | Updated: June 6, 2017 13:18 IST

आज शेतक-यांनी टाळेठोक आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाद्वारे शेतकरी जिल्ह्यातील सरकारी कार्यालयानं कुलूप ठोकत आहेत.

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर/सोलापूर, दि. 6 -  शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा आणि शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे.  १ जूनपासून शेतक-यांचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे.  आज शेतक-यांनी टाळेठोक आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाद्वारे शेतकरी जिल्ह्यातील सरकारी कार्यालयानं कुलूप ठोकत आहेत.
(शेतकरी संप : झेड सुरक्षेत मुंबईत आणले दुधाचे टँकर्स)
 
अहमदनगर 
पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये तलाठी कार्यालयाला शेतक-यांनी टाळे ठोकले. शिवाय  वडनेर येथे बस पेटवण्याचाही प्रयत्न केला.  
 
सोलापूर  
शेतक-यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांनी  मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तर पंढरपुर तहसिल कार्यालयसमोर शेतकरी संघटनेने घोषणाबाजी करत कार्यालयाला टाळं ठोकले. 
(शेतकऱ्यांच्या निषेधाने सरकारच्या कानाचे पडदे फाटले का? - उद्धव ठाकरे)
दुसरीकडे पानगावच्या शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय बंद करून आंदोलन केले. 
 
पुणे-विजापूर बायपास महामार्ग कुरूल येथे जनहित शेतकरी संघटनेने रास्तारोको केला. दुधाचे कॅन-जनावरांसहीत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे दोन्ही बाजूंना 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
 
 
 

सांगली

शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नूतन प्रशासकीय इमारतीस टाळे ठोकून आंदोलन केले. यावेळी अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.  

कोल्हापूर 

शिये येथील तलाठी कार्यालय शेतक-यांनी बंद केलं.
 
अमरावती 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विभागीय आयुक्त  जे.पी.गुप्ता व जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांचे घरासमोर शेतमाल फेकून निषेध नोंदवला. या आंदोलनात सहभागी झालेल्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 
 
 
 
 
 
 

(शेतकरी संपातील पहिली आत्महत्या, कर्जबाजारी तरुण शेतक-यानं संपवली जीवनयात्रा)

राज्यव्यापी शेतकरी संपाचा विषय तापलेला असताना एका तरुण शेतक-यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतक-यांचा संप या आत्महत्येमुळे अधिक चिघळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या शेतक-यानं आत्महत्या केली आहे, त्यानंही ""महाराष्ट्र बंद""मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता.

नवनाथ चांगदेव भालेराव असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव असून ते 30 वर्षांचे होते. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विष पिऊन त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवल्याची माहिती मिळत आहे. येवला लासलगाव रोडवरील पिंपरी फाटा येथे सोमवारी पुकारण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनात नवनाथ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.