शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चे सरण रचून शेतक-याने जाळून घेतले

By admin | Updated: June 13, 2016 08:37 IST

कर्जबाजारी शेतक-याने स्वत:चे सरण रचून जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली.

ळगाव, दि. १३ - कर्जबाजारी शेतक-याने स्वत:चे सरण रचून जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील सबगव्हाण येथे उघडकीस आली आहे. कर्जबाजारीपणास कंटाळून या शेतकर्‍याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते.शनिवारी रात्री ९.३0 वाजेच्या सुमारास नामदेव मरा पाटील (७0 ,रा. सबगव्हाण ता. अमळनेर) यांनी स्मशानभूमीत सरण रचून त्यावर जाळून घेतले. रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीजवळ अमृताबाई नामदेव पाटील यांच्या शेतात आग लागल्याची माहिती गावात कळाली. त्यानंतर गावातील काही लोक व पोलीस पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सरणावर एक वृद्ध जळत असल्याचे आढळून आले. पोलीस घटनास्थळी आल्यावर ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस पाटलांनी जळालेल्या व्यक्तीला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता, शिवाय या व्यक्तीची ओळखली पटली नव्हती.रविवारी सकाळी मारवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी पुन्हा घटनास्थळ गाठले. सरण तारांनी बांधलेले त्यांना आढळून आले. अधिक चौकशी केल्यानंतर शेतमालक नामदेव पाटील हे शनिवारी मुंदाणे येथे मुलीकडे गेल्याचे सांगण्यात आले. मात्र ते मुंदाणे येथे पोहचलेच नव्हते. शेतातील झोपडीवजा घरात त्यांचे आधारकार्ड, पैसे व रॉकेलचा डबाही पडलेला होता. त्यावरून त्यांनीच आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. पाटील यांच्यावर सोसायटीचे ३५ हजार रूपये कर्ज असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, मुलगी असा परिवार आहे. पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. (प्रतिनिधी)