शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

शेतातून ताटापर्यंत: शेतकरी हे कोविड-19मधील खरे नायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 19:08 IST

इतिहासातील हे पहिलेच मानवनिर्मित किंवा नैसर्गिक संकट होते ज्यामध्ये अन्नाचा तुटवडा निर्माण झाला नाही आणि पुरवठ्यामध्ये कोणताही अडथळा आला नाही.

मुंबई: कोविडचा सामना करणारे डॉक्टर, नर्स व सिव्हिक कामगार यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी आपण आणि अवघे जग टाळ्या वाजवत होते आणि थाळ्या व भांडी वाजवत होते तेव्हा अशा काही व्यक्ती दिवसरात्र काम करत होत्या, आपल्याला अन्न पुरवता यावे म्हणून कष्ट करत होत्या, त्या व्यक्ती म्हणजे आपले शेतकरी. त्यांच्यासाठी जणू लॉकडाउन नव्हताच.

इतिहासातील हे पहिलेच मानवनिर्मित किंवा नैसर्गिक संकट होते ज्यामध्ये अन्नाचा तुटवडा निर्माण झाला नाही आणि पुरवठ्यामध्ये कोणताही अडथळा आला नाही. कोविड-19चे संक्रमण झपाट्याने होऊ लागल्यावर, फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्येकाचे आयुष्य खडतर झाले आहे. ही अपूर्व स्वरूपाची परिस्थिती आहे आणि आपल्याला भीतीने ग्रासले आहे.

चांगला काळ, वाईट काळदीर्घ काळ चाललेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये, आपण कुटुंबासोबत चांगला वेळ घालवून, निरनिराळे पदार्थ खाऊन जीवनाचा काही आनंद खऱ्या अर्थाने अनुभवला. आपल्यापैकी काही जणांनी स्वयंपाकाचा आनंद घेतला आणि ते यशस्वी होम शेफ बनले.

काहींना नोकऱ्या गमावलेल्या आणि तातडीने मदतीची गरज असलेल्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणात अन्न बनवले. परंतु, अन्य आपत्तींच्या वेळी होते तसे या आपत्तीमध्ये अन्नाचा तुटवडा कधीही निर्माण झाला नाही. आपल्या शेतकऱ्यांनी सर्व अडथळ्यांचा सामना करत आपले काम सुरूच ठेवले, घराघरात वेळेवर अन्न मिळावे म्हणून त्यांनी जास्तीचे कामही केले.

अडचणींची शर्यतशेतकऱ्यांसाठी फेब्रुवारीचा मध्य ते जुलैचा मध्य हा कालावधी अतिशय व्यग्रतेचा असतो. या कालावधीमध्ये कांदे, बटाटे, गहू, ऊस, मोहरी अशी महत्त्वाची पिके आणि द्राक्षे, डाळिंब, केळे अशी फळे तयार होतात. त्यांना पुढच्या हंगामासाठी (खरिप) जमिनीची मशागतही करायची असते. त्यामुळे त्यांना प्रचंड काम असते. 

सर्वसाधारण परिस्थितीतही शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना व अनिश्चिततेला तोंड द्यावे लागते, जसे अपुरा व विलंबाने येणारा मान्सून, सावकारांची पिळवणूक, पिकाला योग्य दर न मिळणे. लॉकडाउनमुळे मंडई, पुरवठा साखळी व्यवस्था याकडून मागणी विस्कळीत झाला, तसेच कामगारांचा तुटवडा निर्माण झाला.

त्यांचा यथार्थ गौरव करू - #थँकयूफार्मर्स - असे असतानाही, आपल्या शेतकऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याला निरोगी व सक्षम ठेवण्याची जबाबदारी उचलली आणि आपल्याला ताजी फळे, भाज्य व धान्य पुरवले. त्यांना न थांबता काम केले, त्यामुळे आपण लॉकडाउनच्या काळात घरी सुरक्षित राहू शकलो आणि आपल्या मुलांची व वयस्कर व्यक्तींची काळजी घेऊ शकलो.

परंतु, या नायकांच्या योगदानाची दखल घेतली गेली का आणि त्यांचे कौतुक केले गेले का? यानिमित्ताने, लॉकडाउनच्या काळात आपल्याला अन्नाची चणचण भासू न देणाऱ्या, तसेच देशाला खऱ्या अर्थी चालना देणाऱ्या या भूमिपुत्रांना आदराने सलाम करूया.

सह्याद्री फार्म्स या एका सर्वात मोठ्या फार्मर प्रोड्युसर कंपनीने शहरी व ग्रामीण भागाला एकमेकाशी जोडण्यासाठी 'थँक यू फार्मर्स' हे अभियान सुरू केले आहे. ग्रामीण भागांनी शहरी भागांना आणि शहरी भागांनी ग्रामीण भागांना समजून घ्यायला हवे, याविषयी जागृती करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या पुढील सोशल मीडिया पेजेसवर फिल्म पाहाता येईल – यूट्युब, इन्स्टाग्राम व फेसबुक.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या