शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अडत न लागल्याने शेतकरी आनंदीत

By admin | Updated: July 21, 2016 19:37 IST

तब्बल १३ दिवसांच्या बेमुदत बंद नंतर गुरुवारी जाधववाडीतील धान्याचा अडत बाजार सुरु झाला. दुपारपर्यंत शेतकऱ्यांनी ४०५ क्विंटल धान्य विक्रीला आणले

धान्याला चांगला भाव : अडत बाजारात ४०५ क्विंटल धान्याची आवकऔरंगाबाद- तब्बल १३ दिवसांच्या बेमुदत बंद नंतर गुरुवारी जाधववाडीतील धान्याचा अडत बाजार सुरु झाला. दुपारपर्यंत शेतकऱ्यांनी ४०५ क्विंटल धान्य विक्रीला आणले. हर्राशीत गहू,शाळू ज्वारी, बाजरी व तूरीला क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये जास्तीचा भाव मिळाला. शेतकऱ्यांकडून अडत वसूल करण्यात येवू नये, या राज्याशासनाच्या अध्यादेशाचे पालन करण्यास बुधवारी अडत व्यापाऱ्यांनी तयारी दर्शवित आपला बेमुदत बंद मागे घेतला. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील धान्याच्या अडत बाजाराला १३ दिवसानंतरआज सकाळी सुरूवात झाली. बाजार सुरु होणार यामुळे शेतकऱ्यांनीही आपल्याकडील शिल्लक गहू,ज्वारी, बाजरी विक्रीला आणली होती. बाजार समितीच्या अहवालानुसार आज १३१ क्विंटल गहू, ४३ क्विंटल शाळू ज्वारी, २२३ क्विंटल बाजरी तर ८ क्विंटल तूर विक्रीला आली होती. दुपारी हर्राशीला सुरुवात झाली यावेळीस अडते व खरेदीदार मिळून ४० जण हजर होते. औरंगाबाद मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सर्वांना बुधवारी झालेल्या अडत व खरेदीदारांच्या बैठकीत एकमताने झालेल्या नियमाची पुन्हा माहिती दिली.

शेतकऱ्यांकडून अडत घेणार नाही त्या ऐवजी खरेदीदारांनी दिड टक्का अडत द्यावी व हर्राशी झाल्यानंतर खरेदी केलेल्या धान्याची रक्कम नऊ दिवसाच्या आत अडत्याला द्यावी, असे सांगण्यात आले. यानंतर हर्राशीला सुरुवात झाली. बाजरी १६०० ते १९०० रुपये, शाळू ज्वारी १७२० ते २२०० रुपये, गहू १७०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. तूरीला ७५०० ते ८१९० रुपये प्रतिक्विंटलभाव शेतकऱ्यांना मिळाला. ५ जुलैच्या तुलनेत आज धान्याला क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये भाव जास्त मिळाला. अध्यक्ष जैस्वाल यांनी सांगितले की, हर्राशी सुरु होण्यापूर्वी काही खरेदीदारांनी आक्षेप घेतला होता मात्र, नंतर हर्राशी सुरळीत पार पडली.