शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगावात शेतकरी आक्रमक; बाजार समितीत दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 13:38 IST

Khamgaon Apmc News : भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगावात शेतकरी आक्रमक झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गत काही दिवसांपासून भुईमुगाची आवक वाढली आहे. परिणामी, शुक्रवारी बाजार समितीत भुईमुगाचे भाव पडले. भुईमुगाला अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. यावेळी झालेल्या तुरळक दगडफेकीत दोन शेतकºयांसह एक पोलिस जखमी झाला. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे निर्दशनास येताच कृउबासमध्ये पोलिसांना पाचारण करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गत काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात भुईमुगाची आवक वाढली आहे. दरम्यान, वाढत्या आवकीमुळे शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुगाचे भाव पडले. केवळ ३२०० रुपये क्विंटलने खरेदी करण्याचा पुकारा झाल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी विघ्नंसंतोषी लोकांनी शेतकºयांच्या जमावाच्या दिशेने दगड भिरकावले. प्रतिउत्तरात शेतकºयांनीही दगडफेक केली. त्यामुळे दीपक दसरकर या पोलीसासह उंद्री येथील एक शेतकरी जखमी झाला. दसरकर यांच्या हातावर दगड लागला. तर शेतकºयाच्या डोक्यात दगड लागल्याने त्याचे डोके फुटले. त्याचप्रमाणे कृउबास समोर नास्त्याच्या हॉटेलमधील एक जण किरकोळ जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे निर्दशनास येताच, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले.

चएसडीपीओं कोळी ही घटनास्थळी दाखल-स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाल्याचे समजताच शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एसडीपीओ अमोल कोळी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले. पोलिसांनी शेतकºयांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

बाजार समितीत धावपळ!तुरळक दगडफेक आणि शेतकरी आक्रमक झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी बाजार समितीतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यावेळी बाजार समिती प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. एका पाठोपाठ एक अशा तीन गाड्या बाजार समितीत दाखल होताच, शेतकºयांसह अडते आणि उपस्थितांमध्ये धावपळ उडाली. पोलिस कारवाईच्या भीतीने अनेकांनी बाजार समितीतून काढता पाय घेतला.

 

टॅग्स :khamgaonखामगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी