किनगावराजा (जि. बुलडाणा), दि. ४ : येथून जवळच असलेल्या वाघजई येथील गजानन हिंमत बोरुडे (३५) या शेतकर्याने त्याच्या शेतामध्ये विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना ३ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता दरम्यान घडली. वाघजई येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन हिंमत बोरुडे याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातच शनिवारी विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार घरच्या मंडळीच्या लक्ष्यात आल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी देऊळगाव मही येथून जालना येथे निघाले. मात्र वाटेतच सिंदखेडराजा येथेच त्याची प्राणज्योत मालवली. येथे त्याला सिंदखेडराजा येथील आरोग्य अधिकार्यांने मृत घोषीत केले. मृतक गजानन बोरूडे यांच्याकडे कोरडवाहू पाच एकर शेती असून स्टेटबँकेसह सावकाराचेही कर्ज असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. मृतकाच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.
विष प्राशन करुन शेतक-याची आत्महत्या
By admin | Updated: September 5, 2016 00:36 IST