धाड (जि. बुलडाणा) : येथून जवळच असणार्या ग्राम सातगाव म्ह. येथील चाळीस वर्षीय शेतकर्याने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.गजानन संतोष शिंदे असे मृत शेतकर्याचे नाव आहे. शिंदे यांच्याकडे सव्वा एकर कोरडवाहू शेती होती. शेतीसोबतच ते मजुरी करीत होते. गतवर्षीच त्यांनी एका मुलीचे लग्न केले होते. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्रचे १८ हजाराचे कर्ज होते. मागील तीन वर्षांपासून सततची नापिकी, कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी आपल्या राहत्या घरात बुधवार, २९ जूनच्या रात्री गळफास घेतला. या घटनेची धाड पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून, तपास सुरू केला आहे. त्याच्या मृत्युपश्चात पत्नी, आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा आप्त परिवार आहे.
बुलडाण्यात कर्जामुळे शेतक-याची आत्महत्या
By admin | Updated: July 1, 2016 00:43 IST