शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीदारांकडून शेतकरी वेठीला

By admin | Updated: July 18, 2016 01:19 IST

शासनाच्या अडत धोरणाबाबत खरेदीदारांनी अचानक खरेदी बंदची भूमिका घेतल्याने रविवारी शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

पुणे : शासनाच्या अडत धोरणाबाबत खरेदीदारांनी अचानक खरेदी बंदची भूमिका घेतल्याने रविवारी शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. खरेदी बंदमुळे मार्केट यार्डात शेतीमाल मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिला. परिणामी, शेतकऱ्यांना कोथिंबीर, पालक, मेथीची जुडी चक्क एक रुपयाने दराने विकावी लागली. कष्टाने पिकविलेला माल कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकरी निराश झाले. खरेदीदारांच्या आडमुठ्या धोरणामुळे वेठीला धरल्या गेलेल्या काही शेतकऱ्यांना शेतीमाल फेकून देऊन घरी परतावे लागले.मार्केट यार्डात रविवारी सुमारे २२५ ट्रक मालाची आवक झाली. मात्र, ऐन खरेदीच्या वेळी खरेदीदारांनी सामूहिकरीत्या माल खरेदी करण्यास नकार दिल्याने बाजारात एकच गोंधळ उडाला. बाजार समिती प्रशासन आणि अडत्यांनी प्रयत्न करूनही खरेदीदार शेतीमाल खरेदीसाठी तयार झाले नाहीत. परिणामी, रविवारी बाजार ठप्प झाल्याचे दिसून आले. बाजारात काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पोलिसांना पाचारण केले. परंतु, गोंधळामुळे बराच उशीर झाल्याने पालेभाज्या व फळभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. खरेदीदारांचा बहिष्कार आणि पावसाची हजेरी यामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. सर्वसाधारणपणे ८ ते १० रुपयांना विकली जाणारी पालेभाज्यांची गड्डी रविवारी एक ते दोन रुपये दराने विकली गेली. शेतकऱ्यांचे गाडीचे भाडेही सुटले नाही. काही शेतकऱ्यांनी कंटाळून जाग्यावरच माल सोडून दिला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे म्हणाले, ‘‘खरेदीदारांकडून बंद पुकारला जाणार असल्याचे रात्री उशिरा समजल्यानंतर काही खरेदीदारांबरोबर चर्चा केली होती. खरेदीदारांची कोणती संघटना नसल्यामुळे अचानक पुकारलेल्या बंदला सामोरे जावे लागले. खरेदी बंद झाल्याने माल शिल्लक राहिला. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही आढावा घेऊन शिल्लक राहिलेला माल शहरात विकण्याबाबत प्रयत्न करीत आहोत. काही शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात सोडून जावा लागला. हे खरे असले तरी अशा शेतकऱ्यांची संख्या थोडी आहे. यापुढे खरेदीदारांनी बंद पुकारल्यास पर्यायी व्यवस्थेचा विचार सुरू आहे. अधिकाऱ्यांशी बोलून आठवडे बाजाराच्या आरक्षित जागांवर शेतीमाल विक्री केली जाणार आहे.>शेतीमालाचे दर घसरलेबाजार समिती प्रशासनाने बैठक घेऊन खरेदीदार व शेतकऱ्यांची भूमिका ऐकून घेतली. मात्र, या सर्व गोंधळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मागणीअभावी काही फळभाज्यांचे दर निम्म्याने, तर काहींचे दर ३० ते ४० टक्क्यांपर्यंत खाली घसरले. त्यामुळे बाजारात माल शिल्लक राहिला.