शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज फेडून शेतक-याने घेतला गळफास!

By admin | Updated: March 13, 2016 02:30 IST

पीक कर्जाचा पूर्ण भरणा केला आणि मग इहलोकीची संपवली यात्रा.

बोरगाव मंजू (अकोला): गत काही वर्षांपासून अत्यल्प पाऊस, सततची नापिकी यामुळे हतबल झालेल्या कट्यार येथील एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. एरव्ही, कर्जाचे ओझे असह्य़ झाल्यामुळे शेतकर्‍यांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना उघडकीस येतात. या शेतकर्‍याने मात्र पीक कर्जाचा पूर्ण भरणा केला आणि मग इहलोकीची यात्रा संपवली. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कट्यार येथील सुरेश किसन खराटे (४८) यांच्याकडे आठ एकर शेती असून, यावेळी त्यांच्या पिकांनाही अत्यल्प पावसाचा फटका सोसावा लागला. त्यामुळे सोयाबीन व तूर पीक हातचे गेले. लावलेला खर्चही न निघाल्याने ते चिंतेत होते. याच नैराश्यातून त्यांनी स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, बाळू खराटे यांनी माहिती दिल्यानंतर, बोरगाव मंजूचे ठाणेदार भास्कर तवर, पोलीस उपनिरीक्षक उईके, हेडकॉन्स्टेबल अरुण गावंडे, जनार्दन चंदन, हरीश सातव यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. १२ फेब्रुवारीला केला होता कर्जाचा भरणानापीकीमुळे आर्थिक घडी विस्कटलेली असतानाही सुरेश खराटे यांनी त्यांच्या डोक्यावर असलेले सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज फेडले होते. खराटे यांनी पिककर्ज म्हणून घेतलेली १ लाख १७ हजार ९२५ रुपयांची रक्कम १२ फेब्रुवारी रोजी सोसायटीत जमा केली. याबाबतचा ह्यनिलह्णचा दाखलाही त्यांना देण्यात आला आहे.