शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

पावसाच्या दांडीमुळे शेतक:यांची कोंडी

By admin | Updated: June 19, 2014 22:28 IST

रिमझीम पाऊस धारांचा वर्षाव तोही मोजकाच, मान्सूनने सध्या चक्क दांडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पेण : मान्सून सध्या लहरी अवस्थेत पडत आहे. ना बेडकांचा डराव डराव ना, आभाळात ढगांची गर्दी, स्वच्छ कोरडे निरभ्र आभाळ अन् मध्येच कधीतरी रिमझीम पाऊस धारांचा वर्षाव तोही मोजकाच, मान्सूनने सध्या चक्क दांडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खरीप हंगामाची सुरुवात करताना खाचरामध्ये (शेतामध्ये) पाणीच साठले नसल्याने शेतक:यांना शेतीच्या कामांसाठी खोळंबावे लागत आहे. पावसाचे चित्र असेच राहिले तर मात्र खरीप हंगाम, संकटाच्या सीमारेषेवर उभा राहील अशी भीतीही शेतकरी वर्गाला सतावत आहे.
वेधशाळेने गेले तीन दिवस 48 तासात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज वर्तविला होता मात्र वेधशाळेचा फतवा मनावर न घेता लहरी मान्सूनने चक्क दांडी मारली आहे. गेले चार पाच दिवस हलक्या पावसाच्या रिमझीम सरीचा वर्षाव सोडता दिवसभर पडणारे कडक उन्हामुळे, धूळ पेरणी केलेले भाताचे राब अंकुरले असून लुकलुकणा:या हिरव्या तृणपात्यांना आभाळ पहाण्यासाठी आतुरलेले असताना पावसाने मारलेली दांडी व पडणारे कडक उन्हामुळे ही कोवळी रोपे जळून जाण्याची भीती शेतक:यांना सतावित आहे. किरकोळ पाऊसधारा आणि प्रचंड उकाडा यामुळे वातावरणातील बदल पीकपाणी व मानवी आरोग्यासही घातक ठरत आहे. या तापमानातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकला, अतिसार, काविळीसारख्या साथीच्या रोगांना निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे. 
पावसाची लांबलेली एण्ट्री शिवार परिसर, पशुपक्षी व मानवी जीवनावर परिणाम करणारी आहे. पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या वाढीस लागत असून एव्हाना पाण्याचे स्त्रोत भरणारा मान्सून लहरी झाल्याने मान्सूनअभावी सगळय़ांची अवस्था कठीण झाली आहे. (वार्ताहर) 
 
पावसाअभावी रोपे करपण्याची भीती
वडखळ :  प्रचंड उष्म्याने जिवाची लाहीलाही होत असताना रोहिणी नक्षत्र पूर्णपणो कोरडे गेले असताना मृग नक्षत्रमध्ये पावसाचे आगमन झाले. शेतीची कामे सुरु झाली. भाताचे बियाणो रुजून रोपे तयार होऊ लागली. मात्र दमदार पाऊस न झाल्याने शेतामध्ये पाणी साठले नाही व जमिनीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाणीही जिरले नाही. आता तर पावसाने दडी मारल्याने रुजलेली रोपे करपण्याच्या भीतीने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. मात्र गेली काही वर्षे प्रस्तावित येणारे नवे प्रकल्प, समुद्रतटीय संरक्षक खारभूमी बंधारे यांची झालेली तुटफूट त्यामुळे खारे पाणी शेतामध्ये घुसून बाधित झालेली शेती, मजुरांची कमतरता, शेती उत्पन्नापेक्षा शेती करण्यासाठी येणारा अवाढव्य खर्च याचा ताळमेळ जुळत नसतानाही आपली कर्मभूमी असलेल्या शेतीमध्ये इथला शेतकरी आनंदाने कष्ट करतो. त्याचीच परिणिती म्हणून पावसाचे चित्र हवामान अंदाज नैसर्गिक आपत्ती यांना न घाबरता रायगडकर शेतकरी खरीप तथा पावसाचे शेतीमध्ये नेहमीच आनंदाने सहभागी होतो.
या वर्षी बहुतांश शेतक:यांनी संकरित जया, र}ा, कर्जत 3, कर्जत 4, कर्जत 84, एमटी यु-1क्-1क्, सुवर्णा, कोमल, सोनल, सुमा, तुप्ती, गंगोत्री, रुपाली, वैष्णवी आदी महागडी भात बियाणो रुजून रोपे देखील तयार होऊ लागली परंतु पावसाने मध्येच दडी मारल्याने रोपांची वाढ खुंटली असून रोपे करपण्याची भीती निर्माण झाली असून पावसाची स्थिती अशीच राहिली तर दुबार पेरणीचे संकट शेतक:यांवर येणार असल्याने दुबार पेरणीसाठी बियाणो कुठून आणायचे असा प्रश्न शेतक:यां समोर पडला आहे.