जयंत धुळप, अलिबाग२००९पासून वाळीत टाकण्यात आलेल्या मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाड्यातील हरिदास पांडुरंग बाणकोटकर यांच्या कुटुंबावर बुधवारी दुपारी राजपुरी कोळीवाड्यातील जवळपास २५ स्त्री-पुरुषांंनी सुऱ्या, कोयत्यांसह प्राणघातक हल्ला केला. या वेळी घरात हरिदास यांची पत्नी गीता, एक मुलगी आणि तीन मुले होती. या वेळी त्यांच्या पत्नीलाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हेतर, त्यांची समुद्रकिनारी असलेली चहाची टपरी व झोपडी पूर्णपणे तोडून उद्ध्वस्त केली. या हल्ल्याप्रकरणी बाणकोटकर यांनी मुरुड पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी राजपुरीमध्येच राहणाऱ्या मुरुड पंचायत समितीच्या माजी सभापती नीता गिदी, राजपुरी महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना गिदी, राजपुरी पोलीस पाटील यांच्या पत्नी रूपलता आंबटकर, राजपुरीच्या सरपंच हरिकणी गिदी, नारायण चव्हाण, विठा चव्हाण, ताई गिदी, देवकी आगरकर, नीना मालीम, पदमु खरसईकर, जनाबाई चव्हाण, सुनंदा घागरी या बाराजणांवरगुन्हा दाखल केला आहे.
वाळीत कुटुंबावर हल्ला
By admin | Updated: April 10, 2015 04:25 IST