शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे खोटे पत्र व्हायरल; महामंडळाने केली नागपाडा पोलिसांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 09:13 IST

एसटी संपामध्ये सहभागी झालेल्या व सध्या आपल्या कर्तव्यावर रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशा आशयाचे ७ मार्चला एक खोटे परिपत्रक व्हायरल झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटी संपामध्ये सहभागी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असा उल्लेख असलेले पत्र सोमवारी व्हायरल झाले होते. त्यावर एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांची (कर्मचारी वर्ग) स्वाक्षरी होती. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, हे पत्र खोटे असून,  या विरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नाही, अशी राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने शिफारस केल्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना भूलथापांना बळी न पडता सर्व संपकरी कामगारांनी १० मार्चपर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली होती. 

एसटी संपामध्ये सहभागी झालेल्या व सध्या आपल्या कर्तव्यावर रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशा आशयाचे ७ मार्चला एक खोटे परिपत्रक व्हायरल झाले होते. त्यानंतर हे परिपत्रक पूर्णतः खोटे व बनावट असल्याचे स्पष्टीकरण एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे. याशिवाय खोटे पत्र तयार करण्याऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात तत्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी तक्रार एसटी महामंडळाच्या वतीने पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

संपात सहभागी असलेले एसटीचे कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर त्यांच्यावर शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात यावी, असे एक पत्र समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. वास्तविक, अशा प्रकारचा कोणताही निर्णय झालेला नाही, शिवाय अशा प्रकारचे कोणतेही पत्र महामंडळाने जारी  केले नाही. - शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

टॅग्स :ST Strikeएसटी संप