शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळेबाजांचे नातेवाईकही होणार अपात्र !

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

सहकारी बँकांमध्ये घोटाळे करणारे संचालक अपात्र ठरविण्यात आल्यानंतर आता त्यांच्या नातलगांवरही अपात्रतेची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव आणण्याचा

मुंबई : सहकारी बँकांमध्ये घोटाळे करणारे संचालक अपात्र ठरविण्यात आल्यानंतर आता त्यांच्या नातलगांवरही अपात्रतेची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव आणण्याचा सरकारचा विचार असून, सरकारचा हा निर्णय वादग्रस्त ठरू शकतो.सहकारी बँकांमध्ये घोटाळे करणारे संचालक अपात्र ठरविले जातात. मात्र, त्या रिक्त झालेल्या जागांवर त्यांचे रक्ताचे नातेवाईकच निवडून येतात आणि पुन्हा घोटाळे होतात. त्यामुळे यावर उपाय म्हणून येत्या काळात अपात्र संचालकाच्या रक्ताच्या नातेवाइकालाही १० वर्षांसाठी अपात्र ठरविले जाईल, असा प्रस्ताव आणण्याचा सरकारचा विचार आहे, असे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत सादर केले व ते मंजूर करण्यात आले. या विधेयकानुसार सहकारी बँकेच्या अपात्र ठरलेल्या संचालकांना पुढील १० वर्षे (दोन मुदतीच्या कालावधीसाठी) कोणत्याही बँकेच्या समितीचा सदस्य म्हणून राहता येणार नाही. निवडणूक लढविता येणार नाही, की स्वीकृत सदस्य म्हणूनही काम करता येणार नाही. सहकारी बँकांमध्ये घोटाळे करणारे संचालक अपात्र ठरविणारे विधेयक मंजूर झाल्यामुळे याचा सर्वाधिक फटका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना बसणार आहे. (प्रतिनिधी)१० वर्षे निवडणूक लढवता येणार नाहीया विधेयकावर बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले, घोटाळे करणारे संचालक अपात्र ठरवून पदमुक्त केले जातात. मात्र, पुढे निवडणूक होऊन त्यांची रिक्त जागा त्यांच्याच रक्ताचे नातेवाईक घेतात. त्यामुळे संबंधित संचालकांवर कारवाई होऊनही काहीच साध्य होत नाही. यावर उपाय म्हणून अपात्र ठरलेल्या संचालकांच्या मुले, पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण अशा रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाही १० वर्षे संचालकपदाची निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरवावे, अशी सूचना केली. तालिका सभापती योगेश सागर यांनीही अपात्र ठरलेल्या संचालकाच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला लाभ मिळू नये, अशी सूचना केली. या सूचनांची दखल घेत सहकारमंत्र्यांनी तसा प्रस्ताव आणण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले.विधेयकातील तरतुदींची अंमलबजावणी केव्हापासून होणार, हे स्पष्ट नाही.