शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक पद्धत रोखणार बनावट दारू

By admin | Updated: August 23, 2016 06:52 IST

कामाच्या निविदा रद्द करताना होलोग्रामपेक्षा वेगळी ‘ट्रॅक अ‍ॅन्ट ट्रेस’ पद्धती आणण्याचे नियोजन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने केले जात आहे.

अतुल कुलकर्णी,

मुंबई- होलोग्राम पद्धतीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले गेले म्हणून या कामाच्या निविदा रद्द करताना होलोग्रामपेक्षा वेगळी ‘ट्रॅक अ‍ॅन्ट ट्रेस’ पद्धती आणण्याचे नियोजन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने केले जात आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ४ जून रोजी राजीनामा दिला आणि होलोग्रामची निविदा महाटेंडर या वेबसाईटवर १८ जून रोजी प्रकाशित झाली. मात्र याची सगळी प्रक्रिया खडसे मंत्री असतानाच्या काळात झाल्याचे समोर येत आहे. आता होलोग्रामची पद्धतीच रद्द केल्याने नवीन प्रक्रिया अंमलात येईपर्यंत कर बुडवून दारू विकणाऱ्यांना पुढचे काही महिने राज्यात मोकळे रान मिळणार आहे. या सगळ्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून जुन्याच पद्धतीने व्यवहार चालू ठेवण्यात एका दारू लॉबीला सध्यातरी यश आले आहे. दरम्यान, स्टॅम्प पेपर्स छापून त्यातून पैसा छापण्याचे प्रकार जसे तेलगीच्या काळात घडले तसे होलोग्रामच्या बाबतीत घडू नये म्हणून ही सगळीच पद्धती मोडीत काढून पूर्णत: नवीन आणि जगभरात वापरली जाणारी पद्धती आणण्यासाठी संबंधित विभाग कामाला लागला आहे. ज्यावेळी निविदा प्रकाशित झाली त्यावेळी हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा होलोग्रामच्या निविदा प्रकाशित झाल्या त्यावेळी त्यात टाकण्यात आलेल्या अटी आणि शर्थी ठराविक कंपनीला डोळ्यापुढे ठेवून केल्या गेल्याची तक्रार दिल्लीतल्या एका बड्या मंत्र्यांने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याविषयाच्या फाईलीवर काही प्रश्न उपस्थित केले. त्याची समाधानकारक उत्तरे अधिकाऱ्यांनी दिली नाहीत म्हणूनच विभागाचे तत्कालिन आयुक्त विजय सिंघल आणि सचिव डॉ. पी.एस. मीना यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याचेही आता समोर येत आहे.>...तर महसूल वाढेलदारुविक्रीतून होणारी करचोरी करोंडोंमध्ये आहे. जर यासाठी अत्यंत आधूनिक अशी पध्दती आणली गेली तर राज्याच्या तिजोरीत काहीही न करता हजारो कोटींचा महसूल वाढेल. हे लक्षात आल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या राज्याने यावर भर देण्यासाठी होलोग्रामच्या पुढे जाण्याचे ठरवले आहे.

>ठेकेदारांची जुनी ‘गँग’ मोडीत काढा

निविदेशी संबंधित सगळी प्रक्रिया खडसे यांच्याच कार्यकाळात झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या कोणत्याही वादात न पडता कर चुकवून दारू विकणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी अत्याधुनिक अशी ‘ट्रॅक अ‍ॅन्ट ट्रेस’ पद्धती राबवली जाणार आहे. त्यासाठी व्ही. राधा यांना अभ्यास करण्याचे आदेश दिले असून, मंत्रालयात काम करणारी ठेकेदारांची जुनी ‘गँग’ मोडीत काढण्याच्याही सूचना त्यांना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे वृत्त आहे.