शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तोतया आयकर अधिकाऱ्याला तळोजामध्ये अटक, अनेक आयकार्ड, बनावट शिक्के, कागदपत्रे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:28 IST

Crime News: बीकेसी आयकर विभागात काम करणारा कंत्राटी चालकच बनावट आयकर अधिकारी म्हणून वावरत होता. या बनावट आयकर अधिकाऱ्याला मंगळवारी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी तळोज्यातून अटक केली आहे.

- मंगेश कराळे  नालासोपारा- बीकेसी आयकर विभागात काम करणारा कंत्राटी चालकच बनावट आयकर अधिकारी म्हणून वावरत होता. या बनावट आयकर अधिकाऱ्याला मंगळवारी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी तळोज्यातून अटक केली आहे. आरोपीकडे अनेक आयकार्ड, बनावट शिक्के, नियुक्तीपत्रे व इतर कागदपत्रे सापडली आहेत. या आरोपीने किती लोकांना आयकर विभागात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. तसेच आरोपीला वसई न्यायालयात हजर केल्यावर ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

संतोष भवनच्या तांडापाडा येथील अजमेरी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सफारुद्दीन खान (४९) यांच्या मुलीला आयकर विभागाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. आरोपी रिंकू शर्मा व अंशु पासी या दोघांनी त्यांच्या मुलीला आयकर विभागात कामाला लावतो असे सांगितले होते. त्यांच्या मुलीला आयकर विभागाचे ओळखपत्र व ट्रेनिंगचे पत्र देऊन तिला नोकरीला न लावता आर्थिक फसवणूक केली होती. पेल्हार पोलिसांनी १३ डिसेंबरला गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार करत होते.

तपासादरम्यान रिंकू शर्मा (३३) हा आरोपी तळोज्यात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली. आरोपीला पोलिसांनी मंगळवारी सापळा लावून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर २८ बनावट आयकर विभागाचे आयकार्ड, अनेक शिक्के, नियुक्तीपत्रे व इतर कागदपत्रे सापडली. आरोपी पकडल्याची माहिती मिळताच फसवणूक झालेल्या लोकांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात गर्दी केली होती. आतापर्यंत ४० ते ४२ नागरिकांसह सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणींना बनावट आयकर निरीक्षकाचे आयकार्ड व नियुक्ती पत्रे देऊन दोन करोड पेक्षा अधिक रुपयांना गंडा घातला असल्याचे प्रथम दर्शनी पुढे आले आहे. आरोपीने अनेक वरिष्ठ आयकर अधिकाऱ्यांकडे कंत्राटी पद्धतीने चालक म्हणून काम केले असल्याने त्यांच्या व्हिजिटिंग कार्ड व फोटोसह कागदपत्रांचा गैरवापर केला आहे. आरोपीकडे सीबीआय पोलीस कमिश्नर, वरिष्ठ आयकर अधिकारी असल्याचे आयकार्ड दाखवून लोकांना गंडा घातला आहे. आरोपी एका कारवर पिवळा अंबर दिवा लावून वसई विरार परिसरात फिरून २० ते २५ जणांची फसवणूक केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सपोनि सोपान पाटील, पोउपनिरी उमेश भागवत, सफौ. अशोक पाटील, पोहवा मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, सुनिल पाटील, मनोहर तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईVasai Virarवसई विरार