शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: May 13, 2014 03:42 IST

बनावट नोटा तयार करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात अंभोरा पोलिसांना यश आले असून दोन मुख्य आरोपींना नवी मुंबईतून, तर तिघांना आष्टी तालुक्यातील उंदरखेड येथून अटक करण्यात आली आहे

कडा (बीड) : बनावट नोटा तयार करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात अंभोरा पोलिसांना यश आले असून दोन मुख्य आरोपींना नवी मुंबईतून, तर तिघांना आष्टी तालुक्यातील उंदरखेड येथून अटक करण्यात आली आहे. हसमुख पटेल, अनिकेत केदारे (दोघे बेलापूर, नवी मुंबई), राजू भास्कर वामन, जीवन बाबासाहेब वामन आणि शैलेश अंबादास वामन (सर्व रा. उंदरखेल, ता. आष्टी) अशी त्यांची नावे आहेत. मुंबई-बीड कनेक्शन असलेल्या या रॅकेटमध्ये आणखी कोणी गुंतले आहेत काय, याचा शोध घेतला जात आहे. राजू, जीवन आणि अंबादास या तिघांनी २ मे रोजी आष्टी तालुक्यातील धानोरा येथे एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिलापोटी १०० रुपयांच्या बनावट नोटा दिल्या. हॉटेलचालकांना संशय आल्याने या तिघांसह त्याने पोलीस ठाणे गाठले. नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १०० रुपयांच्या ५० नोटा जप्त केल्या. या टोळीची पाळेमुळे नवी मुंबईतील बेलापुरात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी राजूच्या मदतीने सापळा रचला. १०० रुपयांच्या आणखी ५० नोटा हव्या असल्याचे राजूने फोनवर हसमुख पटेल आणि अनिकेत यांना सांगितले. १० मे रोजी पोलिसांनी बेलापुरात एका संगणकाच्या दुकानात सापळा रचून या दोन मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याजवळील बनावट नोटा छापण्याचे रंगीत झेरॉक्स मशिन, प्रिंटर, दोन दुचाकी आदी साहित्य जप्त करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)