शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

९५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तोडगा काढण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 06:03 IST

कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार रविवारीही कायम राहिला.

मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार रविवारीही कायम राहिला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना महासंघासोबत शनिवारी झालेल्या बैठकीतही तोडगा काढण्यात अपयश आल्याने बारावीच्या ९४ लाख ८५ हजार उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. त्यामुळे बारावीच्या निकालावर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले की, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत महासंघाच्या झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगण्यात आले. मात्र वित्त मंत्रालयाकडे प्रस्ताव अडकल्याने मागण्यांचे आदेश काढण्यात त्यांनी हतबलता व्यक्त केली.शिक्षकांच्या मागणीमुळे शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नसल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. ते म्हणाले की, अर्थसंकल्पात शिक्षण विभाग ज्या निधीची तरतूद करते, त्यातून दरवर्षी शिल्लक राहणाºया निधीमध्ये शिक्षकांच्या मागण्या मान्य होतील. महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांच्या मागण्या पूर्ण केल्यानंतरही संबंधित शिल्लक निधीमधून काही निधी शिल्लक राहील. त्यामुळे अर्थ विभागाला शिक्षकांसाठी केवळ तांत्रिक तरतूद करण्याची गरज आहे. जोपर्यंत महत्त्वाच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा महासंघाने घेतला आहे.मूल्यांकनाची यादी जाहीर करा!चार वर्षांपूर्वी अनुदानास पात्र शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर आजघडीला १ हजार ५७६ शाळांमधील केवळ १४६ शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर उरलेल्या शाळा पात्र ठरल्यानंतरही यादी जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जर दीड हजारांहून अधिक शाळा मूल्यांकनास पात्र ठरल्या, तर नेमक्या कोणत्या निकषांवर ही यादी जाहीर झाली, यावरही महासंघाने संशय व्यक्त केला आहे.सरकारने मेस्मा लावावाच!गेल्या १७ वर्षांहून अधिक काळापासून विनावेतन शिकवणाºया विनाअनुदानित शिक्षकांवर कुटुंबासह आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मेस्माअंतर्गत सरकारने कारवाई करूनच दाखवावी, असे आव्हान महासंघाने दिले आहे. मेस्माअंतर्गत कारवाई करताना कुटुंबासह तुरुंगामध्ये टाकण्याचे आवाहनही महासंघाने केले आहे. 

टॅग्स :examपरीक्षाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार