शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांनी चांगला ज्योतिषी शोधावा: बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 14:31 IST

फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी युतीच्या 220 जागा येणार, विरोधीपक्ष नेता करता येईल एव्हढ्या जागा सुद्धा विरोधकांना मिळणार नसल्याचा दावा केला होता.

मुंबई : राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे आरोप सतत भाजपकडून करण्यात येत आहे. तर याच मुद्यावरून राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचा समाचार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांचे सर्वचं अंदाज चुकतायत त्यामुळे त्यांनी चांगला ज्योतिषी शोधावा अशी बोचरी टीका थोरात यांनी केली आहे.

थोरात हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी युतीच्या 220 जागा येणार, विरोधीपक्ष नेता करता येईल एव्हढ्या जागा सुद्धा विरोधकांना मिळणार नसल्याचा दावा केला होता.

त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर हे सरकार अधिक काळ टिकणार नसल्याचे सुद्धा फडणवीस म्हणाले होते. पण त्यांची सर्व भाकिते खोटी ठरली असल्याचे थोरात म्हणाले. तर फडणवीस यांच्या या वक्तव्याची थोरात यांनी खिल्ली उडवत, फडणवीसांनी आता कुठलेही भाकित करण्यापूर्वी चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगवाला.

तर नागरिकत्व सुधारित कायद्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली आहे. हा कायदा लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली असली तरी राज्यात हा कायदा लागू होणार नाही, असेही यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.