शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा: फडणवीस म्हणतात फायदा; तर आदित्य ठाकरेंचा फसवणूक झाल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 13:40 IST

मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांना पीक विम्याचा दिलासा मिळाला असल्याचा दावा करत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे पीक विम्याचा मुद्दा पुढे करत शिवसेना आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तर विधानसभेत युती होणारच असे म्हणणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये परस्परविरोधी भूमिका असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनांतर्गत दिलासा मिळाल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे पीक विम्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा दावा करत आहे.

विधानसभा निवडणुकीत पुन्हा युती होणार असल्याचे बोलले जात असले तरीही, शिवसेनेचे नेते भाजपवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. गेली पाच वर्षे शेतकरी कर्ज माफीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेनेने आत पीक विम्याच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये पीक विम्यावरून परस्परविरोधी भूमिका असल्याचे समोर आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांना पीक विम्याचा दिलासा मिळाला असल्याचा दावा करत होते. तर दुसरीकडे त्यांच्याच सोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अनेकदा, खासगी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप जन आशीर्वाद यात्रेतून  केला होता.  नुकसानग्रस्त शेतकरी हक्काचे पैसे मागायला गेले तेव्हा तुमच्या गावाचे नुकसान झाले नाही, केवळ तुमच्या शेताचे झाले, अशी उत्तरे कंपन्यांनी दिली असल्याचा दावा सुद्धा आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला होता. 

भाजप-सेनेत युतीसाठी दोन्ही पक्षाकडून प्रयत्न होत असले तरीही, मात्र शिवसेनेकडून भाजपवर टीका सुरूच आहे. आधी पीक कर्ज, पीक विमा आणि त्यातच आता आर्थिक मंदीचा मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षामधील परस्परविरोधी भूमिका पुन्हा समोर आली आहे.