शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर, राणेंना मंत्रिपदासाठी पाहावी लागणार वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 10:40 IST

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. आता हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचंही भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ठरल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी काल रात्री भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली.गेल्या काही दिवसांपासून हिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार होणार असल्याची चर्चा होती. परंतु आता तो लांबणीवर पडल्याचीही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावरही निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री विनय कोरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात काहीशी कमकुवत असलेल्या भाजपाची नारायण राणेंच्या माध्यमातून घट्ट पाय रोवण्याची रणनीती आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक माजी मुख्यमंत्री फोडून भाजपा काँग्रेसचे आणखी खच्चीकरण करण्याच्या तयारीत आहे.गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एसआरए प्रकल्पात बिल्डरला लाभ देणे आणि मुख्यमंत्र्यांचा खोटा शेरा मारल्याचा आरोप झाल्याने त्यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे. त्यांना मंत्रिपदावरून हटविण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे. त्यांचे मंत्रिपद राहिलेच तर त्यांचे खाते बदलले जाऊ शकते. मंत्रिमंडळातील काही निष्क्रिय मंत्र्यांनाही डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. फेरबदलासाठी शिवसेनेतही हालचाली सुरू आहेत. सुभाष देसाई यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला तर त्यांच्या रिक्त जागी नियुक्ती व्हावी म्हणून शिवसेनेच्या काही प्रमुख आमदारांनी फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेला मिळालेल्या खात्यांपैकी उद्योग हे सर्वात महत्वाचे खाते आहे. त्यामुळे शिवसेनेच्या काही मंत्र्यांचाही या खात्यावर डोळा आहे.बैठकीला कोण कोण नेते उपस्थित?भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे हे उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे