शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस ‘बोगस’, सदाभाऊ ‘भामटा’, तर पवार ‘अविश्वासू’ - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 07:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘बोगस माणूस’,मंत्री सदाभाऊ खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात केला.

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘बोगस माणूस’,मंत्री सदाभाऊ खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात केला.

स्वातंत्र्यानंतर देशात ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या गरिबी हटाओ व पाकिस्तानच्या मुद्यावर लढल्या गेल्या; पण २०१९ ची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढली जाणार आहे. ही ताकद शेतकरी नेत्यांच्या एकजुटीबरोबर चळवळीची असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरात रविवारी (10 फेब्रुवारी) एका खासगी कार्यक्रमात त्यांनी महाविद्यालयीन तरुणांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. त्यामध्ये ‘रॅपिड फायर’मध्ये ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? असे प्रश्न विचारण्यात आले, यावर फडणवीस ‘बोगस माणूस’, खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचे उत्तर त्यांनी दिले.

शरद जोशी यांचा महामानव असा उल्लेख करत शेट्टी यांनी चर्चेला सुरुवात केली. आंदोलन आणि दंगल यात फरक असून, दंगलीबद्दल तिरस्कार असतो. आंदोलनातून इतरांना त्रास होतो, हे जरी खरे असले, तरी शिवारातील वेदना घरापर्यंत पोहोचली तर स्फोट होण्यास वेळ लागत नाही. शेतकरी नेत्यांत जरूर मतभिन्नता आहे; पण ध्येय एकच आहे. त्यातूनच गेल्या दोन वर्षांत देशपातळीवर अनेक आंदोलने उभारली, त्या माध्यमातून काही मागण्या मान्यही करून घेतल्या. काँग्रेस की बहुजन विकास आघाडीसोबत जाणार हे ठरलेले नाही; पण माझी वैचारिक भूमिका ठरलेली आहे. राज्य घटनेला आव्हान देणाºयासोबत कदापि जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राजकारण गेले खड्ड्यात, शेतकºयांच्या घामाचे पैसे महत्त्वाचे आहेत. कोणाच्यात दम असेल, तर अशी उघड भूमिका घ्यावी, असे आव्हानही शेट्टी यांनी दिले.शेट्टींना केलेले प्रश्न, कंसात उत्तरे

शेतकरी की लेखक (लेखक), दिल्ली की मुंबई (केव्हाही दिल्लीच), कोणाची भीती वाटते (भीतीच नाही), राग आला तर (डोळे मिटतो), मनाला लागलेला आरोप (जमिनी घेतल्याचा), काय करायला नको होते (महायुती).

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारSadabhau Khotसदाभाउ खोत