शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

चित्रपट महामंडळाच्या सभेत हाणामारी

By admin | Updated: January 7, 2016 02:07 IST

माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमाच्या हिशेबातील १३ लाख रुपये ताबडतोब भरावेत, अन्यथा कामकाज सुरू न करण्याचा निर्णय सभासदांनी

कोल्हापूर : माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमाच्या हिशेबातील १३ लाख रुपये ताबडतोब भरावेत, अन्यथा कामकाज सुरू न करण्याचा निर्णय सभासदांनी घेतल्याने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची द्विवार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी गोंधळ तसेच मुंबईकर विरुद्ध कोल्हापूरकर सभासद यांच्यातील हाणामारीने पार पडली. शाहू स्मारक भवन येथे दुपारी तीन वाजता सभेस सुरुवात झाली. यामध्ये ज्येष्ठ सभासद अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी तत्कालीन अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या कारकिर्दीत १० कोटी रुपये महामंडळाला मंजूर झाल्याबाबत विचारणा केली. यावर प्रसाद सुर्वे यांनी हे दहा कोटी महामंडळाला नव्हे तर, चित्रनगरीच्या फेन्सिंगसाठी मंजूर झाले होते आणि त्यापैकी ७ कोटी ५० लाख रुपये या कामासाठी खर्च झाले आहेत, असे उत्तर दिले. मात्र याने कुलकर्णी यांचे समाधान झाले नाही.यानंतर रणजित जाधव, दिग्दर्शक यशवंत भालकर आदी सभासदांनी सुर्वे यांनी ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात महामंडळाचे ५० लाख रुपये खर्च करीत महामंडळाचे नुकसान केले. त्यापैकी १३ लाख रुपये स्वत: च्या खिशातून भरून देतो, असे सांगत मागील सभेत सभासदांसमोर आश्वासन दिले. मात्र, हे आश्वासन अद्यापही पूर्ण न केल्याने आताच्या आता सभागृहात १३ लाखांचा धनादेश आणि त्यावेळी लिहून दिलेला बॉण्डपेपर सादर करावा, अशी मागणी केली.यावरून मुंबईतील सभासद आणि कोल्हापुरातील सभासदांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली. नंतर हा वाद वाढत गेला आणि दोन्ही बाजूच्या सभासदांमध्ये हाणामारी सुरू झाली. त्यावेळी बंदोबस्तासाठी बाहेर उभे असलेले पोलीस सभागृहात दाखल झाले. त्यांनी दोन्हीकडील सभासदांना आवरल्यानंतर पुन्हा सभा सुरू झाली. यावेळी अध्यक्ष विजय पाटकर यांनी सभेपुढील ८ विषयांपैकी ७ विषय आवाजी मताने मंजूर करून घेतले. त्यानंतर पुन्हा गोंधळाला सुरुवात झाली. यावेळी पुन्हा रणजित जाधव, यशवंत भालकर आदी मंडळी आक्रमक झाली. यावेळी अध्यक्षांना तुम्हाला अशा पद्धतीने कारभार करता येणार नाही. १३ लाखांच्या वसुलीचे काय ते बोला असे सांगितले. तथापि, पाटकर यांनी गोंधळातच सभा संपल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)