शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

फेसबुकला टक्कर

By admin | Updated: January 11, 2015 02:32 IST

फेसबुक व लिंकडिनसारख्यांना ‘काटे की टक्कर’ देऊ शकेल, असे हे पहिलेवहिले प्रोशल (प्रोफेशनल+सोशल) नेटवर्क असणार आहे.

पुण्याच्या मित्रांनी तयार केले ‘प्रोशल’प्रोफेशनल व सोशल नेटवर्किंगला आव्हानपराग पोतदार - पुणे कामाचा रेटा सुरू असताना आपल्याला मित्रांची लुडबुड नको असते आणि मित्रांसोबत कल्ला सुरू असताना कामाचा विषय नको असतो़ पण सध्याच्या सोशल नेटवर्किंगच्या जगात हा चॉइस कुठला? जरा थांबा... पुण्यातील तरुण टेक्नोसॅव्ही मित्रांनी एकत्र येऊन त्यावर ‘रायपिन’ हा नवाच पर्याय शोधून काढलाय. फेसबुक व लिंकडिनसारख्यांना ‘काटे की टक्कर’ देऊ शकेल, असे हे पहिलेवहिले प्रोशल (प्रोफेशनल+सोशल) नेटवर्क असणार आहे.संपूर्णत: भारतीय असणारे ‘रायपिन’ हे नवे फोरम सध्याच्या सर्व सोशल नेटवर्किंगमध्ये अद्ययावत व नावीन्यपूर्ण ठरणारे आहे. पुण्यातील या पाचही मित्रांनी दीड वर्ष त्यावर काम केले. सध्याच्या सोशल नेटवर्किंगमधील अनेक त्रुटी डोळ््यासमोर होत्याच. त्या कमी करून ऐकता येणारे अपडेट्स, पर्सनल टच, अपडेट्स अशा अनेक सुविधा त्यांनी नव्या पर्यायात उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यापासून ‘रायपिन’ हे पूर्णपणे अ‍ॅक्टिव्ह झालेले असेल. सद्य:स्थितीत अवघ्या पाच दिवसांत ९०० जणांनी त्यांच्या पेजला भेट दिली असून, ३०० जणांनी नोंदणीही केली आहे. तरुणाईचा प्रतिसाद लक्षात घेऊन त्याची आणखी क्षमता विस्तारली जाणार आहे. यात नवीन काय ?लॉग इन होताच गुडमॉर्निंग, गुड डेच्या शुभेच्छा मिळणार... ई-गव्हर्नन्सचे अद्ययावत अपडेट्स मिळणार ‘स्पीक अप’ माध्यमातून दिवसभरातील अपडेट्स चक्क ऐकता येणार फेसबुकच्या लाइकला मर्यादा आहेत. त्यामुळे शेअर करता येणार.जपा स्वातंत्र्य अन् कामही या विषयी ‘लोकमत’शी बोलताना रोहन म्हणाला, की आजची तरुणाई सोशल नेटवर्किंगवर रमते हे खरं. पण त्यात अनेक त्रुटी आहेत, तसेच मर्यादाही. मला स्वत:ला त्या जाणवल्या. आपले ‘सोशल लाइफ’ वेगळं असतं आणि प्रोफेशनल जग त्याहून वेगळे़ ते एकमेकांत आपल्याला मिसळायचं नसतं. ही सुविधा सोशल नेटवर्किंगवर नाही, म्हणूनच आम्ही तयार केलंय ‘प्रोशल’ नेटवर्क. ज्यामुळे स्वातंत्र्य जपता येतं. काम आणि मित्र यांची सरमिसळ होतच नाही. ही कल्पना रोहन ठुसे या तंत्र अभियंत्याची. त्याला अनिकेत लाटे, मिहीर आंबेकर, अनिकेत ठाणगे व संकेत ढोरजे या मित्रांची साथ मिळाली. त्यांनी देशातील पहिले ‘प्रोशल’ नेटवर्किंग साकारले आहे.