शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

डोळे पाणावले, कंठ दाटला...

By admin | Updated: September 4, 2014 00:58 IST

चिमुकल्या ‘युग’वर बुधवारी दुपारी गंगाबाई घाट येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील आणि मोठ्या भावाने अग्नी दिला. अंत्ययात्रेत जनसागर उलटला होता. यावेळी महिला असो

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार : जनसागर उलटला नागपूर : चिमुकल्या ‘युग’वर बुधवारी दुपारी गंगाबाई घाट येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील आणि मोठ्या भावाने अग्नी दिला. अंत्ययात्रेत जनसागर उलटला होता. यावेळी महिला असो की पुरुष सर्वांचेच डोळे पाणावले होेते. युगचे अपहरण झाले, तेव्हापासून शहरातील प्रत्येक नागरिक त्याच्यासाठी काळजी करीत होता. अपहृत ‘युग’चा निर्घृण खून करण्यात आल्याचे वृत्त समजताच सामान्यजनही हादरून गेले. प्रत्येकाची पावले युगच्या घराकडे वळली. बुधवारी सकाळपासूनच डॉ. मुकेश चांडक यांच्या छापरूनगर चौकातील गुरुवंदना अपार्टमेंटजवळ गर्दी व्हायला सुरुवात झाली. प्रत्येकाला युगला एकदा तरी डोळे भरून पाहायचे होते. पाहता पाहता हजारोंनी गर्दी केली. त्यांना आवरता येणेही शक्य नव्हते. अपार्टमेंटच्या आत पार्किंगमध्ये चांडक कुटुंबीयांसह अपार्टमेंटमधील फ्लॅटधारक आणि परिसरातील नागरिक युगची प्रतीक्षा करीत होते. गर्दी इतकी झाली की लोकांना आवरणे कठीण होत होते. आप्तेष्टांकडून नागरिकांना वारंवार आवाहन केले जात होते. रस्त्यावर तर लोक होतेच परंतु परिसरातील इमारतींवरही लोक युगची प्रतीक्षा करीत उभे होते. अपार्टमेंटमधील युगचे मित्र आणि शेजारीसुद्धा इमारतींवरील बालकनीत उभे राहून त्याची प्रतीक्षा करीत होते. अंत्यसंस्कारातूनसामाजिक संदेश ‘युग’चे अपहरण करून निर्घृण खून केल्याच्या घटनेमुळे चांडक कुटुंबीय हादरून गेले आहे. त्यांना स्वत:चाच होश नव्हता, परंतु अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपल्या लाडक्या चिमुकल्या युगच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर न करता केवळ संपूर्ण गोवऱ्यांचाच वापर करून सामाजिकतेचा संदेश दिला. ‘युग’ला अखेरचा निरोप अंत्यसंस्काराचे घरगुती सोपस्कार पार पडल्यावर ‘युग’ची अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. छापरूनगर चौक, वर्धमाननगरमार्गे ही अंत्ययात्रा गंगाबाई घाट येथे पोहोचली. अंत्ययात्रा पाहण्यासाठी मार्गात प्रत्येक ठिकाणी लोकांनी गर्दी केली होती. गंगाबाई घाट येथे सुद्धा हजारो लोक अगोदरच उपस्थित होते. शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. वडील आणि भावाने अग्नी दिला. यानंतर सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अंत्ययात्रेत राजकीय पुढाऱ्यांसह, डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यापाऱ्यांसह, घरगुती नोकरदार इतकेच नव्हे तर तरुणांसह समाजातील सर्वच स्तरातील मंडळी सहभागी झाली होती. आई-वडिलांसह कुटुंबीयांनी फोडला हंबरडा सकाळपासूनच सर्वच जण युगची प्रतीक्षा करीत होते. शवविच्छेदनानंतर दुपारी १.५५ वाजता ‘अ‍ॅम्बुलन्स’ आली. प्रत्येकाचे डोळे अ‍ॅम्बुलन्सकडे वळले. एका पांढऱ्या कापडात गुंडाळलेले ‘युग’चे पार्थिव अ‍ॅम्बुलन्समधून बाहेर काढताच एकच हंबरडा फुटला. आई, वडील व मोठा भाऊ धृव तसेच इतर कुटुंबीयांची अवस्था रात्रभरापासून रडून अगोदरच वाईट झाली होती. आई-वडिलांची अवस्था तर वेड्यागत झाली होती. यावेळी इमारतीतील युगचे मित्र, मैत्रिणी आणि शेजाऱ्यांच्या भावनांचाही बांध फुटला. त्यांनी आपल्या भावनांना अश्रूंद्वारे वाट मोकळी करून दिली. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. शांतीचे आवाहनयुगच्या हत्येनंतर संपूर्ण शहरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर लकडगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात निर्माण झालेला तणावानंतर बुधवारी नागरिक आणखी तीव्र निदर्शने करतील अशी चिन्हे होती. युगच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतला आणि नागरिकांनी शांत रहावे, कायदा हाती घेऊ नये असे आवाहन करण्यात आले. ‘आय लव्ह यू बेटा’...आईची शेवटची आर्त हाक युगच्या अपहरणापासून त्याची आई आपली शुद्ध हरपून बसली होती. दोन-तीनदा बेशुद्ध झाल्याने तिला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. परंतु बुधवारी जेव्हा तिने आपल्या चिमुकल्याला तीन दिवसांनी पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती वेडावून गेली होती. युगची अंत्ययात्रा निघाली तेव्हा ती आपल्या चिमुकल्याला सोडायलाच तयार नव्हती. ती सुद्धा युगसोबत जाण्याची चिद्द करू लागली. आप्तेष्टांनी तिची बरीच समजून काढली. तिच्या हातातून युगच्या पार्थिवाची सुटका केली आणि गेट बंद केले, तेव्हा युगच्या नावाचा हंबरडा फोडता ‘युग आय लव्ह यू बेटा’... अशी शेवटची आर्त हाक तिने दिली. भावनांचा आवेगयुगच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगी केवळ त्याचे नातेवाईक व परिसरातील नागरिकच नव्हे तर शहरातील सर्व स्तरांतील लोक उपस्थित होते. जवळच्या झोपडपट्टीमधील तरुणांचादेखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता. काही नागरिकांनी यावेळी गंगाबाई घाट परिसरात पोस्टर्स व बॅनर्समधून आपल्या भावना व्यक्त केल्या. आरोपीला थेट फाशीच देण्यात यावी अशी मागणी यातून समोर येत होती. काही लोकांनी या घटनेचा अहिंसात्मक मार्गाने निषेध करण्यासाठी ‘कॅन्डल मार्च’ला नागरिकांनी जमावे असे आवाहन ‘बॅनर’ हाती घेतलेल्या काही मुलांकडून करण्यात आले.