यदु जोशी, मुंबईमंत्रालय प्रवेशासाठी नागरिकांनी रांगेत तिष्ठत उभे राहू नये म्हणून आता आॅनलाईन प्रवेश पास मिळणार आहे. तर दुसरीकडे मंत्रालयात वारंवार कामे घेऊन येणा-यांवर आता थेट गृहविभागाची नजर राहाणार आहे. मंत्रालयात दलाल मंडळी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडून असतात. तर दुसरीकडे सामान्य नागरिकांना प्रवेशासाठी रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते. त्यामुळे मुख्यमत्र्यांनी सामान्य प्रशासन आणि गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंत्रालयातील प्रवेशाची सध्याची पद्धत बदलण्याचा निश्चय केला आहे.
मंत्रालयातील दलालांवर ‘नजर’
By admin | Updated: January 13, 2015 03:14 IST