शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रोचा बालेवाडीच्या १५ एकर जागेवर डोळा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 03:30 IST

पुणे मेट्रोच्या कार्यक्षेत्रात येत नसतानाही बालेवाडी येथील १५ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मेट्रोच्या मार्गासाठी किंवा स्थानकासाठी नव्हे, तर या जागेवर व्यावसायिक संकुल उभारून त्याद्वारे निधी उभारण्याची शक्कल लढविली जाणार आहे. सुमारे १५ एकर जागा असून झपाट्याने विकसित होत असलेल्या आयटी उद्योगामुळे या जागेला सोन्याचे मोल आहे.

पुणे : पुणे मेट्रोच्या कार्यक्षेत्रात येत नसतानाही बालेवाडी येथील १५ एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मेट्रोच्या मार्गासाठी किंवा स्थानकासाठी नव्हे, तर या जागेवर व्यावसायिक संकुल उभारून त्याद्वारे निधी उभारण्याची शक्कल लढविली जाणार आहे. सुमारे १५ एकर जागा असून झपाट्याने विकसित होत असलेल्या आयटी उद्योगामुळे या जागेला सोन्याचे मोल आहे. मेट्रोपाठोपाठ आता पीएमआरडीनेही आपल्या कार्यक्षेत्रात ही जागा येत असल्याने आपल्यालाच मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला आहे.पुणे मेट्रो आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्र्राधिकरण या दोघांनी या बालेवाडी येथील सरकारी १५ एकर जागेची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, येथे दोन्ही मेट्रोचे स्थानक, डेपो अथवा मेट्रोसंदर्भातील कोणतेही बांधकाम करणार नाहीत. या सरकारी जागेवर पीपीपी मॉडेलद्वारे (पब्लिक- प्रायव्हेट पार्टनरशिप) व्यावासायिक संकुल उभे करून निधी उभारण्यात येणार आहे. या जागेसंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शासनाला पाठविण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या वतीने मेट्रो कार डेपो, मेट्रो स्थानक, कर्मचाºयांसाठी निवासस्थान व कार्यालयांसाठी जागा आणि मेट्रो डेपोसाठी पुण्यातील शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय, शासकीय धान्य गोदाम, कोथरूड येथील शिवसृष्टीसाठी राखीव असलेली आणि बालेवाडी येथील जागेची मागणी केली आहे. पुणे मेट्रोचा मार्ग व अथवा कार्यक्षेत्र या भागात नसतानादेखील झपाट्याने विकसित होत असलेल्या व आयटी पार्कमुळे प्रचंड मागणी असलेल्या बालेवाडी येथील जागेची मागणी केली आहे. दरम्यान पीएमआरडीएच्या वतीनेदेखील बालेवाडी येथील जागा आपल्या कार्यक्षेत्रात येत असून, भविष्यात या परिसरात मेट्रो येऊ शकते. ही जागा द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. सध्या विकासकामांसाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने जागा विकसित करून निधी उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठीच पुणे मेट्रो आणि पीएमआरडीए या दोघांनीदेखील अत्यंत मोक्याच्या बालेवाडी येथील जागेची मागणी केली आहे.जिल्ह्यातील विविध संस्थांनी जमीन वापराच्या नियमांचे शर्तभंग केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एक वर्षांपूर्वी अनेक संस्थांकडून जागा काढून घेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेला बालेवाडी येथे १५ एकर जमिनीचे वाटप करण्यात आले होते. या संस्थेने जागेचा वापरच न केल्याने ही जमीन काढून घेण्यात आली असून, पुन्हा सरकारजमा करण्यात आली आहे. तेव्हापासूनच या जागेवर डोळा आहे.