शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संस्थांना जादा एफएसआय

By admin | Updated: January 16, 2015 06:12 IST

राज्यातील शासकीय, सार्वजनिक प्राधिकरण आणि चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संचालित शिक्षण संस्थांना कृषक आणि ना विकास झोनमधील जमिनीवर इमारती

यदु जोशी, मुंबईराज्यातील शासकीय, सार्वजनिक प्राधिकरण आणि चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संचालित शिक्षण संस्थांना कृषक आणि ना विकास झोनमधील जमिनीवर इमारती उभारण्यासाठी जादा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचे नगरविकास विभागाने प्रस्तावित केले आहे. नगरविकास विभागाने या निर्णयाबाबतची सूचना जारी केली असून, त्यावर येत्या ५ फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. यामुळे राज्याच्या ग्रामीण भागात शिक्षण संस्थांचे जाळे उभारण्यास मदत होणार आहे. शिक्षण संस्थांना विस्तारासाठी उपलब्ध जमिनीवर जादा एफएसआय मिळेल. वाढत्या नागरीकरणात शेतजमिनीचा वापर नागरी सोईसुविधांसाठी होत असल्याने शेतजमिनीचे क्षेत्रफळ कमी होत आहे. ते वाचविण्याचाही उद्देश या निर्णयामागे आहे. वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकशिक्षण संस्थांना आजवर १२ मीटर ते १५ मीटर रुंदीच्या रस्त्यालगत असलेल्या भूखंडावर ०.२ चटई क्षेत्र बांधकामासाठी दिले जात होते. आता त्यांना ०.३ जादा एफएसआय दिला जाणार आहे. अशा प्रकारे ०.५ इतका एफएसआय मिळेल आणि संबंधित संस्थेला तळमजला अधिक तीन मजले असे बांधकाम करता येईल. १५ मीटर ते १८ मीटर रुंद रस्त्यालगत असलेल्या भूखंडावर सध्या ०.२ एफएसआय आहे. त्यांना जादाचा ०.५ एफएसआय मिळेल. एकूण ०.७ एफएसआयच्या आधारे तळमजला अधिक पाच मजले अशी इमारत संस्थेला उभारता येईल. एकूण १.० एफएसआयच्या आधारे तळमजला अधिक सात मजली इमारत उभारता येईल. फक्त इमारतीची उंची ३० मीटरपेक्षा अधिक असू नये ही अट राहील.