शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 14:53 IST

सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी सदस्य समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी तशी घोषणा आहे. पत्रकार परिषदेत सावंत यांनी ही माहिती आहे. 

पुणे, दि. 7 - सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी सदस्य समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी तशी घोषणा आहे. पत्रकार परिषदेत सावंत यांनी ही माहिती आहे. ''आजवर सदाभाऊ खोत यांनी केलेले काम लक्षात घेता आणि त्यांच्यावर काही दिवसांत झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर तात्काळ निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्यावरील होणा-या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे'', असे दशरथ सावंत म्हणालेत.

तसेच ''सदाभाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणून मंत्रिपदावर आहेत. त्यांचे पद काढून घेण्यात यावे याविषयी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचीही माहिती यावेळी सांगण्यात आली.  

तर ''सदाभाऊ यांना सत्ता सुंदरीचा स्पर्श झाल्याने मोह सोडविला जात नाही'', अशी खोचक टीका स्वाभिमानी संघटनेचे प्रकाश फोफळे यांनी केली आहे.  शिवाय, सरकारमध्ये राहण्याच्या निर्णयाबाबत आठवडाभरात कार्यकारिणीची बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितले आहे.  

नेमके काय आहे प्रकरण ?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी द्रोह केल्याचा ठपका सदाभाऊ खोत यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान, चौकशी समितीला सामोरे जाण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून फारकत घेण्याचे संकेत सदाभाऊ खोत यांनी दिले होते. त्यावेळी निर्णय पक्षनेतृत्वाने घ्यावयाचा आहे, असे सांगत खासदार राजू शेट्टी यांच्याकडे चेंडू टोलावला होता. शिवाय, आपण यापुढे कोणत्याही चौकशी समितीसमोर जाणार नसल्याचेही यावेळी खोत यांनी सांगितले होते. समितीने त्यांना 21 प्रश्न विचारले होते. या सर्व प्रश्नांची सदाभाऊंनी आधीच लिखित उत्तरे तयार ठेवली होती. त्याच प्रत समितीच्या सदस्यांना देण्यात आली. संघटनेशी आपण कुठलाही द्रोह केला नसल्याचा दावा खोत यांनी केला.सरकारमध्ये मंत्री म्हणून आपली वैधानिक जबाबदारी होती. भारतीय जनता पक्षाशी संघटनेने युती केली होती. सरकारमध्ये गेल्यानंतर रस्त्यावर येऊन आंदोलकांची भूमिका घेणे शक्य नव्हते. तरीही शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता या नात्याने आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकार यांच्यातील दुवा बनण्याचे काम आपण प्रामाणिकपणे केले,' अशी भूमिका खोत यांनी समितीसमोर मांडली. त्याचबरोबर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये भाजपाशी युती असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. भाजपाने सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद दिल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. सत्तेत सहभागी होताच खोत संघटनेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न विसरले, असा आरोप शेट्टी यांनी केला होता.

परिणामी, एकेकाळच्या या जिगरी दोस्तांमधील दरी वाढत गेली. वाद इतका विकोपाला गेला की, वडिलांच्या आजारपणासाठी दिलेल्या उसन्या पैशाचे हिशेबही त्यांनी जाहीरपणे चुकते केले. त्यानंतर, गेल्या महिन्यात राजू शेट्टी यांनी पुणे ते मुंबई अशी पायी आत्मक्लेश यात्रा काढली होती. त्यात खोत सहभागी झाले नव्हते. त्यावेळी, खोत यांच्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ, असं सूचक विधान शेट्टींनी केलं होतं.