शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

कॅबिनेट सचिवांना दिली मुदतवाढ

By admin | Updated: June 2, 2014 23:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे कॅबिनेट सचिव अजितकुमार सेठ यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.

मोदींचे धक्कातंत्र सुरूच : एका दगडात मारले अनेक पक्षी
हरीश गुप्ता - नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे कॅबिनेट सचिव अजितकुमार सेठ यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. 
सेठ यांना यापूर्वी 13 जूनर्पयत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ते 13 डिसेंबर्पयत कॅबिनेट सचिव पदावर राहतील. मोदींनी या पदासाठी लॉबिंग करीत असलेल्या अनेक वरिष्ठ सचिवांना दूर सारले आहे. यामध्ये शांतनू बेहुरिया (अवजड उद्योग), नावेद मसूद (कंपनी व्यवहार) आणि इतरांचा समावेश आहे.  दूरसंचार सचिव एम.एफ. फारुखी हे काही आठवडय़ात निवृत्त होत आहेत. तसेच  नगर विकास सविच सुधीर कृष्णा यांचा कार्यकाळ जुलैअखेर संपत आहे.
अवजड उद्योग सचिव शांतनू बेहुरिया हे सेवाज्येष्ठतेत अग्रक्रमांकावर आहेत. ते कॅबिनेट सचिवपदासाठी लॉबिंग करीत होते. त्यांनी अमित शहा, जे.पी. नड्डा, राजनाथसिंग आणि भाजपाच्या अनेक नेत्यांची भेट घेतली. पण त्यांची फाईल बघून मोदी अनुकूल नव्हते.
बेहुरिया हिमाचल कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. मोदींनी या राज्यात बरेच वर्ष काम केले आहे. उच्चपदस्थ सूत्रनुसार मोदी यांना प्रदीपकुमार सिन्हा (ऊर्जा) यांना वर्षाअखेर कॅबिनेट सचिव म्हणून बढती देण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठता डावलण्याची आवश्यकता राहणार नाही. 
 
4सेठ यांना मुदतवाढ देऊन मोदींनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. मोदींनी अधिका:यांची नेमणूक, बदली आणि नियुक्ती करताना खुनशीपणा बाळगणार नसल्याचा कठोर संदेश नोकरशहांना दिला आहे. 
4दुसरे म्हणजे कोणत्याही ठोस कारणाशिवाय शासन व्यवस्थेला धक्का लावणार नाही आणि प्रशासकीय सातत्य राखण्यात विश्वास असल्याचे मोदींनी दाखवून दिले आहे. 
4तिसरे म्हणजे अजितकुमार यांच्याऐवजी आपली वर्णी लागावी म्हणून प्रयत्न करणा:यांना देखील मोदींनी कठोर संदेश दिला आहे.